Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा
Showing posts with label संपादकीय. Show all posts
Showing posts with label संपादकीय. Show all posts

Monday, August 14, 2017

नांदेडमध्ये भाजपने सगळेच फोडले, सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड


नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या तोंडावर फोडाफोडीला ऊत आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह युवासेना जिल्हाध्यक्षांनीही आपला राजीनामा ‘मातोश्री’वर धाडला आहे. त्यामुळे एकंदरीतच नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तर तिकडे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
सेना आमदाराचे समर्थक नगरसेवक भाजपात!
शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, ते शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे समर्थक आहेत. विशेष म्हणजे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याही आधी म्हणजे आठवडाभराआधीच प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सदिच्छा भेट घेतली होती. या सर्वच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी राजीनामे देऊन, भाजपप्रवेश करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे एकंदरीतच चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाध्यक्षांचाही राजीनामा
शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला असून, त्यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवला आहे. तर तिकडे नांदेड युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सोबत युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे.
कुठल्या पक्षातील किती नगरसेवकांचा भाजपप्रवेश?
शिवसेना –
  1. विनय गुर्रम
  2. दीपक रावत
  3. ज्योती खेडकर
  4. वैशाली देशमुख
राष्ट्रवादी –
  1. संदीप चिखलिकर
  2. श्रद्धा चव्हाण
काँग्रेस –
  1. नवल पोकर्णा
  2. स्नेहा पांढरे
  3. दजितसिंग गिल
  4. सौ. ठाकूर
  5. किशोर यादव
दरम्यान, नांदेड महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 81 वॉर्ड आहेत. काही दिवसात नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या फोडाफोडीच्या राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Saturday, July 8, 2017

अजब प्रेमाची गजब गोष्ट ! 15 वर्षाचा नवरा आणि 73 वर्षांची वधू



जकार्ता, दि. 7 - प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, कारण प्रेमात अनेकदा वय, धर्म, जात पाहिलं जात नाही. काहीजणांच्या मते हे फक्त चित्रपट आणि पुस्तकातच शोभतं. पण इंडोनेशियामध्ये वयाच्या सीमा ओलांडत एका 15 वर्षाच्या मुलाने 73 वर्षाच्या महिलेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. इंडोनेशियामधील सुमात्रा येथील ही घटना आहे. दोघांनीही आमचं लग्न न करुन दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या लग्नाला परवानगी देण्यात आली, आणि दोघे विवाहबंधनात अडकले. 
हे प्रेमप्रकरण तेव्हा सुरु झालं जेव्हा 15 वर्षांच्या सेलामत रियादीला मलेरिया झाला होता. शेजारी राहणा-या रोहाया बिनती मोहम्मद जकफर यांनी यावेळी त्याची पुर्ण काळजी घेतली. त्यादरम्यानच दोघांमधील प्रेम फुलत गेलं अशी माहिती गावप्रमुख सिक ऐनी यांनी दिली आहे. 
 इंडोनेशियन कायद्यानुसार तरुणांसाठी लग्नाचं वय 19 तर मुलींसाठी 16 आहे. मात्र तरीही सुमात्रा गावाच्या प्रशासनाने या दोघांच्या लग्नासाठी मंजुरी दिली.
 'सेलामत रियादीचं अजून लग्नाचं वय नाही. लग्न करण्यासाठी तो खूप तरुण आहे. पण दोघांनीही आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याने आम्हाला त्यांच्या लग्नाला परवानगी द्यावी लागली', असं गावप्रमुख सिक ऐनी यांनी सांगितलं आहे. दोघांनी आत्महत्या केल्यास आपल्याला पाप लागेल या भीतीने अधिका-यांनीही या लग्नाला विरोध केला नाही. 
सेलामत रियादी अल्पवयीन असल्याने आम्ही हे लग्न धुमधडाक्यात न करता अत्यंत खासगी पद्धतीने करण्याचं ठरवलं', असंही त्यांनी सांगितलं आहे. सध्या तरी जोडप्याने शारिरीक संबंध ठेवू नये, असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सेलामत रियादीच्या वडिलांच्या काही वर्षापुर्वीच निधन झालं आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केलं. त्यामुळे सेलामत रियादीचा योग्य सांभाळ झालाच नाही. त्याची काळजी घेण्यासाठीही कोणी नव्हतं.   
रोहाया यांचं दोन वेळा लग्न झालं असून, दोन्ही वेळा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे. हे त्यांचं तिसरं लग्न आहे. इंडोनेशियामधील एका दुर्मिळ भागात सुदूर कारंग एंडाह गावात त्यांचं लग्न झालं. मात्र त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि जगभरातील अनेकांनी यामध्ये रस घेत माहिती घेण्यास सुरुवात केली.  मी तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो अशी प्रतिक्रिया सेलामत रियादीने लग्नानंतर दिली आहे.