Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा
Showing posts with label देश. Show all posts
Showing posts with label देश. Show all posts

Monday, August 21, 2017

गुजरात दंगा: जाकिया की याचिका पर आज फैसला संभव, मोदी को क्लीन चिट वाले फैसले को चुनौती

याचिका में 2002 के दंगों के पीछे कथित बड़ी आपराधिक साजिश होने के मामले में विशेष जांच दल (एसआईटी) की ओर से क्लीन चिट दिए जाने को सही ठहराने के निचली अदालत के आदेश को चुनौती दी गई है.

अहमदाबाद:  गुजरात हाईकोर्ट साल 2002 के दंगों के मामले में जकिया जाफरी की याचिका पर आज अपना फैसला सुना सकती है. ये याचिका राज्य के तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी और अन्य को निचली अदालत की ओर से क्लीन चिट दिए जाने के खिलाफ दायर की गई थी. जकिया जाफरी दिवंगत कांग्रेस नेता एहसान जाफरी की पत्नी हैं.
हाई कोर्ट ने इससे पहले फैसला सुनाने के लिए नौ अगस्त की तारीख मुकर्रर की थी, लेकिन मामले की सुनवाई करने वाली जस्टिस सोनिया गोकाणी ने कहा था कि वह 21 अगस्त को फैसला सुनाएंगी. मामले की सुनवाई तीन जुलाई को पूरी हो गयी थी.
कोर्ट ने जाफरी और सामाजिक कार्यकर्ता तीस्ता सीतलवाड़ के गैर सरकारी संगठन ‘सिटिजन फॉर जस्टिस एंड पीस’ की पुनर्विचार याचिका पर सुनवाई की. याचिका में 2002 के दंगों के पीछे कथित बड़ी आपराधिक साजिश होने के मामले में विशेष जांच दल (एसआईटी) की ओर से नरेंद्र मोदी सहित 56 लोगों को क्लीन चिट दिए जाने को सही ठहराने के निचली अदालत के आदेश को चुनौती दी गई है.
याचिकाकर्ताओं ने नए सिरे से जांच की मांग की है. याचिका में मोदी और 59 अन्य को दंगों को लेकर आपराधिक साजिश रचने का आरोपी बनाए जाने की मांग की गई है.

मालेगांव ब्लास्ट: कर्नल पुरोहित को जमानत मिली, 9 साल बाद आएंगे जेल से बाहर

NIA ने उन्हें ज़मानत देने का विरोध किया था. इससे पहले बॉम्बे हाई कोर्ट ने उन्हें ज़मानत देने से इनकार कर दिया था. पुरोहित नौ साल के बाद अब जेल से बाहर आ सकेंगे, लेकिन उन पर मुकदमा चलता रहेगा.

नई दिल्ली: साल 2008 मालेगांव धमाके के आरोपी लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित को जमानत मिल गई है. कर्नल पुरोहित की ज़मानत याचिका पर आज सुप्रीम कोर्ट में सुनवाई हुई. पुरोहित 9 साल से नवी मुंबई की तलोजा जेल में बंद हैं. इसी मामले में अप्रैल में साध्वी प्रज्ञा को हाईकोर्ट ने जमानत दे दी थी.
बॉम्बे हाई कोर्ट ने कर दिया था जमानत देने से इनकार
बता दें कि NIA ने उन्हें ज़मानत देने का विरोध किया था. इससे पहले बॉम्बे हाई कोर्ट ने उन्हें ज़मानत देने से इनकार कर दिया था. पुरोहित नौ साल के बाद अब जेल से बाहर आ सकेंगे, लेकिन उन पर मुकदमा चलता रहेगा. पुरोहित ने कोर्ट में दलील दी थी कि उन्हें और साध्वी प्रज्ञा को इस घटना में शामिल बताने वाले कई गवाह बयान बदल चुके हैं.  इसी आधार पर प्रज्ञा को हाई कोर्ट ने ज़मानत दी. लेकिन उन्हें राहत नहीं दी गई.
राजनीतिक कारणों से धमाकों का आरोपी बनाया था- वकील
पिछली सुनवाई में पुरोहित की तरफ से वरिष्ठ वकील हरीश साल्वे ने दावा किया था कि वो सेना की इंटेलिजेंस यूनिट के लिए काम कर रहे थे. इसी मकसद से वो ब्लास्ट के आरोपी संगठन अभिनव भारत की बैठक में शामिल हुए थे, लेकिन बाद में राजनीतिक कारणों से उन्हें धमाके का आरोपी बना दिया गया.

छत्तीसगढ़: रायपुर के भीमराव आंबेडकर अस्पताल में ऑक्सीजन बंद होने से 3 बच्चों की मौत

ऑक्सीजन विभाग का प्रभारी कल रात शराब के नशे में धुत था, इसलिए ऑक्सीजन की सप्लाई रुक गई और तीन बच्चों की जान चली गई. मुख्यमंत्री रमन सिंह ने पूरे मामले की जांच के आदेश दिए हैं
रायपुर:  छत्तीसगढ़ की राजधानी रायपुर में ऑक्सीजन बंद होने से तीन बच्चों की मौत का मामला सामने आया है. राज्य के सबसे बड़े सरकारी अस्पताल भीमराव आंबेडकर अस्पताल में एक कर्मचारी की लापरवाही ने तीन बच्चों की जान ले ली.
बताया जा रहा है कि ऑक्सीजन विभाग का प्रभारी कल रात शराब के नशे में धुत था, इसलिए ऑक्सीजन की सप्लाई रुक गई और तीन बच्चों की जान चली गई. मुख्यमंत्री रमन सिंह ने पूरे मामले की जांच के आदेश दिए हैं.
ऑक्सीजन विभाग के आरोपी प्रभारी को बाद में पुलिस के हवाले हर दिया गया और स्वास्थ्य विभाग ने भी उसे निलंबित भी कर दिया है.
यूपी के गोरखपुर में हुई थी 48 घंटों में 36 बच्चों की मौत
बता दें कि हाल ही में उत्तर प्रदेश में गोरखपुर के बीआरडी अस्पताल में 10 से 12 अगस्त के बीच ऑक्सीजन बंद होने से 36 बच्चों की मौत हो गई थी. इस घटना के सामने आने के बाद पूरे देश में काफी हंगामा मच गया था. ये बच्चे इंसेफेलाइटिस की बीमारी से पीड़ित थे. इस बीमारी से इसी महीने अबतक करीब 70 से ज्यादा बच्चों की मौत हो चुकी है.

Monday, August 14, 2017

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील इंग्लिश स्कुल मधील पाच हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची घेतलीय शपथ

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील इंग्लिश स्कुल मधील पाच हजार विद्यार्थ्यांनी  स्वच्छतेची  घेतलीय शपथ
https://www.youtube.com/watch?v=7REBvFmKGM0&feature=youtu.be
ताज्या बातमी साठी YOUTUBE वर namaskar maharstra वर subcrib करा


https://www.youtube.com/watch?v=7REBvFmKGM0&feature=youtu.be
......................................................................................................................................................................


नांदेडमध्ये भाजपने सगळेच फोडले, सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड


नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या तोंडावर फोडाफोडीला ऊत आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. तर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह युवासेना जिल्हाध्यक्षांनीही आपला राजीनामा ‘मातोश्री’वर धाडला आहे. त्यामुळे एकंदरीतच नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तर तिकडे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.
सेना आमदाराचे समर्थक नगरसेवक भाजपात!
शिवसेनेच्या ज्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, ते शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे समर्थक आहेत. विशेष म्हणजे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याही आधी म्हणजे आठवडाभराआधीच प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सदिच्छा भेट घेतली होती. या सर्वच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी राजीनामे देऊन, भाजपप्रवेश करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे एकंदरीतच चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाध्यक्षांचाही राजीनामा
शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला असून, त्यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवला आहे. तर तिकडे नांदेड युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सोबत युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे.
कुठल्या पक्षातील किती नगरसेवकांचा भाजपप्रवेश?
शिवसेना –
  1. विनय गुर्रम
  2. दीपक रावत
  3. ज्योती खेडकर
  4. वैशाली देशमुख
राष्ट्रवादी –
  1. संदीप चिखलिकर
  2. श्रद्धा चव्हाण
काँग्रेस –
  1. नवल पोकर्णा
  2. स्नेहा पांढरे
  3. दजितसिंग गिल
  4. सौ. ठाकूर
  5. किशोर यादव
दरम्यान, नांदेड महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 81 वॉर्ड आहेत. काही दिवसात नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या फोडाफोडीच्या राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Wednesday, August 2, 2017

अबब! नीता अंबानींच्या फोनची किंमत ऐकून तुम्ही उडालच


मुंबई, दि. 2 - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी आणि यशस्वी बिझनेसवुमन अशी नीता अंबानी यांची ओळख. त्या शौकीन आहेत आणि तशीच त्यांची ओळखही आहे. त्यांच्या लक्झरी शौकची कल्पना म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात ही 3 लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते यावरूनच येते. गेल्या वर्षी एका मुलाखतीत त्यांनीच याबाबत माहिती दिली होती.  
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. आयपीएलमध्ये स्वतःची टीम मुंबई इंडियन्सला चियर करताना असो की एखाद्या प्रोडक्टच उद्घाटन, नीता अंबानी हे नाव चर्चेत असतंच. लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जाणा-या नीता अंबानींची आवड खूप शाही आहे. त्यांच्या साड्या, घड्याळ, हॅंडबॅग, फुटवेअर प्रत्येक गोष्ट हटके असते. एवढे सर्व शौक असताना टेक्नॉलॉजीच्या जमान्यात त्यांच्याकडे असलेले गॅझेटही शानदार आणि हटके असणार यात काही शंका नाही. त्यांच्याकडे असलेल्या फोनची किंमत ऐकून तुम्ही खरंच उडाल. अर्थात जगातील सर्वात शानदार फोनपैकी एक फोन त्या वापरतात. या फोनच्या किंमतीमध्ये एखादं प्रायव्हेट जेटदेखील घेता येईल. 'एशियानेटन्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, नीता अंबानी या 'फॉल्कन सुपरनोटा आयफोन 6 पिंक डायमंड' हा फोन वापरतात.  
 वृत्तानुसार नीता अंबानींच्या फोनची किंमत 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 311 कोटी रूपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. वर्ष 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता. फोनशिवाय त्या जगातील सर्वात महागडी हॅंडबॅगदेखील वापरतात. 30 ते 40 लाख रूपये इतकी त्यांच्या हॅंडबॅगची किंमत असल्याचं बोललं जातं. याशिवाय जगातील 10 सर्वात महागड्या घरांमध्ये या जोडीच्या घराची गणना होते.
ही आहे फोनची खासियत-
- वर्ष 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता.
- 24 कॅरेट गोल्ड आणि पिंक गोल्डपासून हा फोन बनवण्यात आला आहे.
- या फोनला हॅक करण्याचा प्रयत्न झाला तरीही मालकाला अलर्ट जातो
- फोनवर प्लॅटिनमची कोटिंग आहे त्यामुळे हा फोन तुटणं शक्य नाही.
- लिमिटेड एडिशन असलेल्या या फोनची निर्मीती कंपनी मागणीनुसार करते. 

61 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायमूर्तीने न्यायालयासमोर दिले धरणे


जबलपूर -मध्य प्रदेशमध्ये जबलपूर उच्च न्यायालयाच्या ६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायमूर्तीने न्यायालयासमोर धरणे दिले आहेत. मंगळवारी ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश(एडीजे) आर.के. श्रीवास आंदोलन करत आहेत.
१५ महिन्यांत चार वेळा बदली होणे हे त्यांच्या विरोधामागचे कारण आहे. सत्य बोलल्यामुळे वारंवार बदली करून छळ केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. ते बुधवारीही धरणे आंदोलन करतील. मी मुख्य न्यायमूर्ती व रजिस्ट्रार जनरलना आपल्यावरील अन्यायाची माहिती दिली आहे. असे असताना उच्च न्यायालय प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. दर ४ महिन्याला बदली झाल्यामुळे कुटुंबाला त्रास झाला. या वेळी जबलपूरच्या ख्राइस्ट चर्च स्कूलमध्ये मुलाने प्रवेश घेतला होता. नीमचमधून बदली झाल्यामुळे एकाला शिक्षणासाठी तिथेच ठेवावे लागले. १५ महिन्यांत एखाद्या न्यायमूर्तीची चार वेळा बदली हायकोर्ट बदली धोरणाच्या विरुद्ध आहे. या व्यवस्थेचा ८० टक्के लोकांना त्रास होतो, मात्र कोणी बोलत नाही. मी मात्र संघर्षाचा रस्ता निवडला आहे. मी नीमचला रुजू झालो नाही. नोकरी धोक्यात घालून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मी तुरुंगात जाण्यासही तयार आहे. मात्र, अन्याय कोणतीही किंमत मोजून सहन केला जाणार नाही. माझा जन्म केवळ नोकरीसाठी नाही. मी चुकीचा ठरलो तर तत्काळ राजीनामा देण्यास तयार आहे. मी एक न्यायमूर्ती आहे त्यामुळे मलाही न्याय मिळायला हवा. न्याय न मिळाल्यास धरणे आंदोलनानंतर उपोषणही करेन. दुसरीकडे, एडीजेच्या समर्थनार्थ बार काउंसिलचे वकील उभे राहिले आहेत. कडक उन्हात धरणे देत असलेल्या श्रीवास यांच्यासाठी वकील मंडपाची व्यवस्था करत आहेत.
गेल्या १५ महिन्यांत बदल्या
- ११ एप्रिल २०१६ : धारहून शहडोलला बदली.
- २७ ऑगस्ट २०१६ : शहडोलहून सिहोरला बदली.
- ७ मार्च २०१७ : सिहोरहून जबलपूर हायकोर्ट.
- २१ मार्च २०१७ : जबलपूरहून नीमच.
- श्रीवास २००० मध्ये सिव्हिल जज, द्वितीय वर्ग-२ म्हणून रुजू. १७ वर्षांत त्यांच्या १२ वेळा बदल्या

राज्यसभेत गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर अमित शहा नाराज


नवी दिल्ली -भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षातील खासदारांच्या बेशिस्तीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. राज्यसभेत अनुपस्थित राहायचे असल्यास भाजप खासदारांनी त्याची पूर्वसूचना द्यावी; अन्यथा अनुपस्थितीचे लेखी कारण द्यावे, असे शहांनी बजावले. आपली नाराजी अमित शहा यांनी भाजप संसदीय बैठकीत मंगळवारी बोलून दाखवली.
मागासवर्गीयांसाठी असलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणी विरोधी पक्षांनी वरिष्ठ सभागृहात केली होती. त्या वेळी वरिष्ठ सभागृहात भाजप खासदारांची संख्या कमी असल्याचे शहा यांनी बैठकीत म्हटले. दोन्ही सभागृहांच्या कामकाजादरम्यान भाजप खासदारांची संख्या पूर्ण असणे अपेक्षित आहे.
अनुपस्थितीची चूक पुन्हा होणार नाही, अशी आपली अपेक्षा असल्याची तंबीही शहांनी बैठकीत दिली. विशेष आदेश भाजपने काढले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा नामोल्लेख न करता शहा म्हणाले की, त्यांची उपस्थिती हा पक्षासाठी गंभीर विषय असेल.
७४ मताधिक्याने विधेयक संमत
वरिष्ठ सभागृहात मागास प्रवर्गाविषयीचे विधेयक ५२ विरुद्ध ७४ मताधिक्याने संमत झाले. या वेळी राज्यसभेत भाजपचे ५६ संसद सदस्य उपस्थित होते, तर विरोधी पक्षाचे ८८ सदस्य होते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान अवैध ठरलेल्या मतांचा उल्लेखही या वेळी शहांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पूरग्रस्त परिसराच्या दौऱ्यावर असल्याने त्यांची अनुपस्थिती समजण्यासारखी असल्याचे शहा म्हणाले.

तुमच्या दहशतवाद्याचा मृतदेह घेऊन जा, भारताने पाकिस्तानला सुनावलं


श्रीनगर, दि. 2 - पुलवामा येथे सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी अबू दुजाना याचा मृतदेह पाकिस्तानात पाठवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी यासंबंधी पाकिस्तानी उच्चायुक्ताशी संपर्क साधला असून अबू दुजानाचा मृतदेह घेऊन जाण्यास सांगितलं आहे. काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख असलेला अबू दुजाना पाकिस्तानचा नागरिक होता. जवळपास गेल्या सात वर्षांपासून अबू दुजाना काश्मीरमध्ये सक्रिय होता, सोबतच हिटलिस्टवरही होता.
मंगळवारी पुलवामा येथील काकापोरा येथे सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत अबू दुजाना ठार झाला. अबू दुजाना पाकिस्तानमधील गिलिगट-बाल्टिस्तान येथे राहणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 27 वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तान उच्चायुक्ताला पत्र लिहून एखाद्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून मात्र अद्याप कोणतंही उत्तर किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. 
अबु दुजाना हा पाकिस्तानी नागरिक असून, तो २0१0 साली काश्मीरमध्ये आला आणि उत्तर काश्मीरमध्ये त्याने नेटवर्क उभारले. गेल्या वर्षी जुलैमध्ये लष्करी कारवाईत बुरहान वणी ठार झाल्यानंतर अबु दुजानाकडे संघटनेची सूत्रे होती. त्याच्या अटकेसाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. सुरक्षा दले गेले अनेक महिने त्याच्या शोधात होती. मध्यंतरी पळून जाताना तो स्वत:चा मोबाइल कारमध्ये विसरून गेला. तो सुरक्षा दलाच्या हातात लागल्यामुळे त्याची माहिती मिळवणे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर तो पत्नीला भेटण्यासाठी पुलवामा जिल्ह्याच्या हाकरीपोरा गावातील घरी आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या घराला घेरले. त्याला पहाटे साडेचार वाजता बाहेर येण्याचे आवाहन करण्यात आले. पण तो येत नव्हता. अखेर सकाळी साडेनऊ वाजता लष्कराने घरावर रॉकेट लाँचर डागले. त्याच वेळी अबू दुजानासह आरिफ ललहारीचा खात्मा झाला.
विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 114 दहशतादी ठार झाले असून अबु दुजाना आणि आरिफचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 होता. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गतवर्षी 31 जुलैपर्यंत हा आकडा 92 होता. म्हणजेच यावर्षी 114 दहशतवादी ठार झाले असताना, 2016 मध्ये 92 दहशतवादी ठार झाले होते.

71,400 मुलींचा विवाह लावून देण्यासाठी यूपी सरकारचा पुढाकार, रोखीबरोबर भांडीकुंडी


लखनऊ -उत्तर प्रदेशात गरीब मुलींचा विवाह उत्तर प्रदेश सरकार लावून देणार आहे. राज्य सरकारच्या खर्चानेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात खासदारांव्यतिरिक्त समाजातील प्रतिष्ठित लोकांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. सरकारने या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या २० हजार रुपयांच्या रकमेत कपात केेलेली नाही. ही रक्कम वधूच्या खात्यात जमा केली जाईल. त्याचबरोबर एक स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात येणार आहे.
समाजकल्याण विभागाने यासंबंधात प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला पाठवला आहे. जिल्हाधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक असतील. मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेच्या पहिल्या टप्प्यात ७१,४०० मुलींचे लग्न लावून देण्यात येणार आहे.
रोखीबरोबर भांडीकुंडी
समिती मंडप, विवाह विधी इत्यादीची साेय करेल. लग्नात सरकार ३५ हजार रुपये खर्च करणार आहे. यात मुलीला २० हजार रुपये तिच्या खात्यात देण्यात येतील. दहा हजारांचे कपडे, काही दागिने, सात भांडी आणि स्मार्टफोन देण्यात येईल. पाच हजार रुपये मंडपासाठी दिले जातील.

Sunday, July 30, 2017

वंदे मातरम् न म्हणणे म्हणजे देशद्रोह नाही- केंद्रीय मंत्री



नवी दिल्ली, दि. 30 - वंदे मातरम् या गीतावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही उडी घेतली आहे. वंदे मातरम् हे गीत म्हणणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी निगडित आहे. जे लोक वंदे मातरम् हे राष्ट्रगीत गात नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवता येणार नाही. मात्र वंदे मातरम् या गीताला विरोध करणं हेसुद्धा चुकीचेच आहे, असंही नक्वी म्हणाले आहेत. 
केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री नक्वी म्हणाले, राष्ट्रगीत म्हणणं एका व्यक्तीच्या आवडीशी संबंधित आहे, मात्र वंदे मातरमला विरोध करणं ही देशभक्ती ठरू शकत नाही. जर एखादी व्यक्ती वंदे मातरम् गात नसल्यास ती व्यक्ती देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी असल्याचं ठरवू शकत नाही. वंदे मातरम् हे गीत गाणं हे व्यक्तीच्या स्वातंत्र्येचा एक भाग आहे. पण तरीही एखादी व्यक्ती जाणूनबुजून वंदे मातरमला विरोध करत असल्यास ती त्या व्यक्तीची मानसिकता दर्शवते. मुख्तार अब्बास नक्वी यांनी अबू आझमींवर टीकेची झोड उडवली आहे. 
दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेत वंदे मातरम म्हणण्यावरून वाद निर्माण झाला होता. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढले तरी चालेल असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या विधानसभेत ‘वंदे मातरम्’चा मुद्दा चांगलाच गाजला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला.
काय झालं विधानसभेत-
औचित्याच्या मुद्द्यावर भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल माध्यमांमध्ये वंदे मातरम् गीतासंबधी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थीत केला. या देशात राहून वंदे मातरम गायला विरोध केला जातोय. या देशात राहणाऱ्यांना वंदे मातरम म्हणावंच लागेल असं गोटे म्हणाले. यावर आझमींनी उत्तर देण्याची परवानगी मागितली. त्यावेळी सत्ताधारी आमदारांनी गोंधळ सुरू केला. अबू आझमी वेलमध्ये उतरले. दोन्ही बाजूंनी  आमदारांच्या घोषणा सुरू होत्या.
यानंतर आझमी म्हणाले, त्यांनी इतिहासाचा दाखला दिला, देशासाठी अनेक मुस्लिमांनी बलिदान दिलं,  या देशात मोहब्बत फक्त गीत गाऊन होणार नाही. मुस्लीम आहे म्हणून विरोध का करता ? सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हे गीत कोणी लिहले ? शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते काय ? अफजल खानाच्या भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वकिल कोण होते ? इंग्रजांच्या विरोधात लढणारे टिपू सुलतान कोण होते ? त्यामुळे आम्ही देशविरोधी आहोत असं पसरवू नका, माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ काढला जात आहे. सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा, हिंदुस्थान झिंदाबादचा नारा आम्ही एकवेळ नाही तर हजारवेळा देऊ, पण वंदे मातरम म्हणणार नाही.
यानंतर एकनाथ खडसेंनी अबू आझमींवर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् या गीताने झाली आहे.  तर तुम्हाला आक्षेप का? मेल्यानंतर या जमिनीत पुरावं लागतं. जिथे तुम्ही वाढला, लहानाचं मोठं झाला,मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार, इथलेच कफन घ्यावं लागणार, इथलीच हवा, इथलेच पाणी फुकट मिळतं मग त्या मातीला नमन करायला, या देशाला सलाम करायला काय अडचण आहे ? असं म्हणत खडसे यांनी इस देश मे रहेना होगा तो वंदे मातरम् कहना होगा असं ठणकावलं. 

लालूंचा नवा डावपेच; नितीश कुमारांना शह देण्यासाठी शरद, मांझींना आरजेडीत येण्याचे निमंत्रण


पाटणा- बिहारमध्ये जेडीयू-भाजप आघाडीचे सरकार बनल्यानंतर राजद प्रमुख लालू यादव यांनी जेडीयूचे नेते शरद यादव यांनी हिंदुस्तान अवामी मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांना आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद यादव यांना तर थेट राजद मध्ये सामील होण्याचे निमंत्रणच धाडण्यात आले आहे. नितीश कुमार हे राजद- काँग्रेसच्या महाआघाडीपासून दुर होत सहाव्यादा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. शनिवारी त्यांच्या 26 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता.

लालू म्हणाले, बिगर भाजप पक्षांनी एकत्र यावे
- लालू प्रसाद यांनी शरद यादव यांना आवाहन केले आहे की, बिगर भाजप पक्षांनी एकत्र यावी यासाठी त्यांनी मदत करावी.
- मी शरद यादव यांच्यासोबत अनेकदा लाठ्या खालल्या आहेत, असे लालू यादव म्हणाले. शरद यादव यांचे चेले असणाऱ्या नितीश कुमार यांनी त्यांना दगा दिला आहे. शरद यादव माझ्यासोबत आल्यास बिहारमधील गावांचा दौरा करणार असून लोकांना नितीश कुमाराचे खरे रुप सांगणार आहे.
लालू यांनी मांझी यांना केला फोन
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासोबतही लालू यादव यांनी चर्चा केली आहे. त्यांनी त्यांना महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. मांझी यांना हटवत नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले होते.
- रालोसपा नेता उपेंद्र कुशवाह यांनाही लालू हे महाआघाडीत येण्यासाठी निमंत्रण पाठवणार आहेत. ते नितीश कुमार-सुशीलकुमार मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपा अध्यक्ष अमित शहांच्या संपत्तीत 300 टक्यांनी वाढ


सुरत, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू साथीदार आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शहांची संपत्ती 25 कोटी रूपयांनी वाढली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आणि अमित शहा राष्ट्रीय राजकारणात चर्चेमध्ये आले.
राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. गुजरातमधून राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञपत्रात सर्वच उमेदवारांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यात ही माहिती समोर आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शहा दाम्पत्याकडे 2012 मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 8 कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती होती. जी 2017 मध्ये 34 कोटी 31 लाखांवर पोहोचली आहे. एकूण संपत्तीमध्ये जंगल मालमत्ता 1 कोटी 91 लाख रुपयांवरुन 19 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. शहा दाम्पत्याच्या मालमत्तेमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते.
अमित शहा यांनी वार्षिक उत्पन्नापोटी 1 कोटी 49 लाख रूपयांची मिळकत दाखवली आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2013मध्ये मातोश्रींच्या निधनानंतर अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचाही समावेश झाला. म्हणूनच ही वाढ दिसते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

गुजरातमधून राज्यसभेवर ११ सदस्य असून त्यातील इराणी, दिलीपभाई पंड्या (दोघेही भाजपा) आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांची मुदत १८ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असून बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार विकत घेण्यासाठी भाजपाने घोडेबाजार मांडला असून, कोट्यवधी रुपये आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 40 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.    

‘मसाज सेंटर’च्या नावाखाली परदेशी मुलींकडून वेश्याव्यवसाय


पिंपरी-चिंचवड शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या पिंपळे सौदागर परिसरात ‘मसाज सेंटर’च्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फोरच्युना प्लाझामधील ‘चिवा स्पॉ’वर छापा टाकून थायलंडच्या पाच तरुणींची सुटका केली, तर दोघांना अटक केली आहे. ही कामगिरी सामजिक सुरक्षा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे.
अमोल खंडू जाधव (31, रा. पिंपळे सौदागर) आणि दिलू गुआनबे जिबा हौ (21, रा. मुंढवा, मूळ  नागालँड) या दोघांना अटक केली आहे. ‘पिंपरी-चिंचवड शहरातील ‘मसाज सेंटर’ बनतात अवैध धंद्यांची केंद्रे’ या मथळ्याखाली ‘पुढारी’त सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. 
यानंतर गुन्हे शाखा, सामाजिक सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांनी याची दखल घेत बनावट गिर्‍हाईक पाठवून माहिती गोळा केली. सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फोरच्युना प्लाझा येथे मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  पोलिसांनी शुक्रवारी  (दि. 29) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास मसाज सेंटरमध्ये छापा टाकला, त्या वेळी त्या ठिकाणी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना संशयास्पद अनेक वस्तू मिळाल्या आहेत. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या थायलंडच्या पाच तरुणींकडून हे दोघे वेश्याव्यवसाय करून घेत होते. 
या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा  समावेश आहे का, याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी पोलिस निरीक्षक संजय पाटील, अरविंद जोंधळे, सहायक निरीक्षक शीतल भालेकर, चंद्रकांत जाधव, नितीन लोंढे, संदीप गायकवाड, संजय गिरमे, रमेश लोहकरे, नितीन तेलंगे, गितांजली जाधव, कविता नलावडे, सरस्वती कागणे, ननिता येळे या पथकाने केली आहे.

भाजपा अध्यक्ष अमित शहा भारताचे नवे संरक्षण मंत्री?


 दिल्ली, दि. 30 - भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची देशाच्या संरक्षण मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये राजकीय वर्तूळात यासंदर्भातील चर्चेला उधाण आलं आहे. मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिल्यानंतर देशाला पूर्णवेळ संरक्षण मंत्री नसल्यामुळे मोदी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना खासदारकी देऊन त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. या मंत्रिमंडळात अमित शाह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद देण्याचे संकेत आहेत. याशिवाय नुकतेच बिहारमध्ये एनडीएच्या साथीला आलेले नितीश कुमार, यांच्या जेडीयूलाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडेच संरक्षण मंत्रीपदाचा भार आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांना संरक्षण मंत्रीपद सोडावे लागले. पर्रिकरांना संरक्षण मंत्री करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्रीपद सोडावं लागले होते. मात्र विधानसभेच्या निकालाने गोव्याच्या राजकारणाचे चित्र बदलेले त्यामुळे पर्रिकरांना पुन्हा संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात परतावे लागले.
शहा यांनी गुजरातमधून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांचा मार्ग सुकर करण्यासाठीच पक्षानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लावण्यास संघानेही हिरवा कंदिल दाखवला आहे. अमित शहांना गृह किंवा संरक्षण खातं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमित शहा आणि स्मृती इराणी या दोघांनाही भाजपने गुजरातमधून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात विधिमंडळात भाजपचे वर्चस्व असल्याने दोघांचीही खासदारकी निश्चित मानली जात आहे. सध्याच्या घडीला अमित शहा हे गुजरातच्या सरखेज विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. मात्र आता त्यांना राज्यसभेवर पाठवून त्यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपदाची धुरा दिली जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये दुसरे कोणते मोठे नाव असेल तर ते अमित शहा हेच आहे. काही दिग्गज राजकीय जाणकारांच्या मते अमित शहांना कॅबिनेटमध्ये आणले जाईल मात्र त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद दिले जाईल असे नाही. मात्र मोदी हे धक्कातंत्राने निर्णय घेण्यात आणि टायमिंग साधण्यात प्रसिद्ध आहेत. त्याचमुळे अमित शहांच्या खासदारकी मागे वेगळी गणिते असू शकतात अशा चर्चेलाही उधाण आले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


केरळ, दि.30 - केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. राजेश असे या कार्यकर्त्याचे नाव असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी जाताना त्याच्यावर येथील श्रीकार्यम परिसरात  शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास हल्ला करण्यात आला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने राजेशवर हल्ला केला. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल 20 वेळा चाकूने वार केले आहेत. तसेच, हल्लेखोर अद्याप फरार असून त्यांच्या शोध सुरु आहे. 
दरम्यान, राजेशच्या हत्येमागे सीपीआय-एमचा हात असल्याचा आरोप केरळचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कुमानाम राजशेखरन यांनी केला आहे. याचबरोबर या हत्येचा निषेध म्हणून राज्यभर आज हरताळ पुकारला आहे. तर, सीपीआय-एमने कुमानम राजशेखरन यांनी केलेला आरोप फेटावून लावला आहे. शहर पोलीस आयुक्त स्परजंन कुमार यांना सांगितले की, हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शहरात पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


जम्मू-काश्मीर, दि. 30 - सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेत. पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील चकमकीत सुरक्षा जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. आज सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु होती. यामध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा डाव उधळून लावत त्यांना यमसदनी पाठवले आहे. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक अद्याप सुरुच आहे. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील एका घरात तळ ठोकून बसले होते. भारतीय लष्कराला माहिती मिळतास त्यांना घेरले. लष्कर आणि दहशतवाद्यांध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही दहशदवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून नियंत्रण रेषेचं उल्लघंन आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतीय जवान पाकच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देत आहेत. यामध्ये भारतीय जवानही शहीद होत आहेत.

'जय श्रीराम' म्हटल्यानं नितीशकुमारांच्या मंत्र्याविरोधात फतवा


पाटणा, दि. 30 - बिहार विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्यामुळे नितीशकुमार यांच्या मंत्रीमंडळातील खुर्शीद ऊर्फ फिरोज अहमद यांच्या विरोधात एका संघटनेनं फतवा जारी केला आहे. इमारत-ए-शरिया नावाच्या संघटनेनं हा फतवा काढला आहे. या फतव्यात त्यांनी संयुक्त जनता दलाचे आमदार व बिहारचे अल्पसंख्याक मंत्री फिरोज अहमद यांना इस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलेलं आहे. इमारत-ए-शरिया या संघटनेचे मुफ्ती सुहैल अहमद कासमी यांनी हा फतवा जारी केला आहे. यामध्ये त्यांनी फिरोज अहमद यांना विश्वास न ठेवणारा तसेच मुस्लीम धर्मातून बहिष्कृत केलं आहे.
फतवा जारी झाल्यानंतर फिरोज म्हणाले की, बिहारच्या लोकांसाठी मी जय श्रीरामच्या घोषणा दिला होत्या. या घोषणेमुळे जर बिहारच्या जनतेचा विकास होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझ्याविरोधात फतवा काढण्यापूर्वी त्यांनी माझा उद्देश लक्षात घ्यायला हवा होता. जय श्रीराम बोलण्यामागे माझा हेतू स्वच्छ होता. इमारत-ए-शरियाबद्दल मला प्रचंड आदर आहे. मात्र अशा फतव्यांना मी घाबरत नाही.
खुर्शीद यांनी अलीकडेच विधानसभेच्या आवारात 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या होत्या. 'जय श्रीराम' म्हटल्यानं बिहारच्या १० कोटी जनतेचा फायदा होणार असेल तर मी सकाळ-संध्याकाळ जय श्रीराम म्हणायला तयार आहे. इस्लाममध्ये द्वेषाला थारा नाही. प्रेम हाच इस्लामचा पाया आहे. रहीमसोबत मी रामालाही पूजतो, असं त्यांनी म्हटलं होतं.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या कॅबिनेटचा विस्तार केला आहे. काही खाती नव्या मंत्र्यांना देताना विभागणीही करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याकडे अर्थ खात्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांना त्यांचं आधीचंच खातं देण्यात आलं आहे, तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. शनिवारी संध्याकाळी पाटणा येथील राजभवनात राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठींनी २६ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. खुर्शीद आलम यांच्याकडे अल्पसंख्यक कल्याण आणि उस उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.

बुधवारी संध्याकाळी नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत बिहारच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला होता. संपूर्ण देशबांधवांसाठी हा अनपेक्षित धक्काच होता. पण त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच मोदींनी नितीशकुमाराच्या या निर्णयाचं कौतुक करत जे काही ट्विट केलं होतं ते पाहून हळूहळू बिहारच्या राजकारणातलं बदललेलं चित्र स्पष्ट होऊ लागलं. त्यानंतर भाजपाच्या साथीनं त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

GST मुळे व्यापाऱ्यांवर ग्राहकांचा विश्वास वाढला, न्यू इंडियाचे स्वप्न 5 वर्षांत साकारू - पीएम मोदी


नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 34 व्या मन की बात मध्ये रविवारी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाऊस आणि जीएसटीवर आपले मनोगत व्यक्त केले. जीएसटीवर पंतप्रधानांना लोकांचे काही पत्र आले आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर ग्राहकांचा व्यापाऱ्यांवर विश्वास वाढला असा दावा मोदींनी केला आहे. तसेच पावसावर बोलताना सरकार पूरग्रस्तांची पूर्णपणे मदत करत आहे. यासोबतच, सर्वच देशवासियांनी न्यू इंडियाचा संकल्प घ्यावा. सगळे एकत्रित येऊन हे स्वप्न 5 वर्षांत पूर्ण करू असे मोदींनी सांगितले आहे.

- "पावसाळा हा लोकांचे मन मोहणारा ऋतू आहे. कधी-कधी पावसाचे रौद्र रूप सुद्धा पाहायला मिळते. निसर्गाचा हा रूप पाहून निराशा देखील होते."
- "गेल्या काही दिवसांपासून गुजरात, राजस्थान आणि ईशान्य भारतासह पश्चिम बंगालमध्ये पूर आला आहे. सरकार पूरग्रस्तांना पूर्णपणे मदत करत आहे."
- "लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान लोकांना सुखरूप बाहेर काढणे आणि इतरत्र हलवण्याचे काम करत आहेत. पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी पीक विमा योजनेसाठी आम्ही कंपन्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत."
- "हेल्पलाईन नंबरवर फोन करून शेतकरी आपल्या व्यथा मांडत आहेत. हवमानाचा अंदाज जवळपास खरा निघत आहे. हे सर्व काही अंतराळ तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे."
- जीएसटीमुळे व्यापाऱ्यांवर ग्राहकांचा विश्वास वाढला आहे. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीतून खऱ्या अर्थाने संघराज्य शासन पद्धती दिसून आली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Friday, July 28, 2017

पतीची हत्या करुन 'ती' मृतदेहासोबत 2 दिवस झोपली


नवी दिल्ली, दि. 28 - दारू पिऊन अतिशय घाणेरड्या शिव्या देणा-या व मारहाण करणा-या पतीला कंटाळलेल्या एका महिलेनं त्याची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या मृतदेहाचा बंदोबस्त करता न आल्याने दोन दिवस ही महिला चक्क पतीच्या मृतदेहाशेजारीच झोपली. ही घटना दिल्लीतील कापसहेडा परिसरातील आहे.  दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला युक्ती सुचली.
यानुसार तिस-या दिवशी सकाळी तिनं लोकांना असे सांगितले की, पतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. लोकांनाही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व मृतदेह घेऊन ते स्मशानभूमीत पोहोचले. आरोपी महिलेचं नाव शिल्पी अधिकारी (वय 32 वर्ष )असे असून पती नितीशची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

कसा उघड झाला गुन्हा?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली व मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वी पोलीस स्मशानभूमीत पोहोचले. पोलिसांनी संशय आल्यानं त्यांनी मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेला. पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे घडल्या प्रकाराचे सत्य सर्वांसमोर आले. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आरोपी पत्नी शिल्पीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शिल्पीनं सांगितले की, नितीश दारू पिऊन मारहाण करायचा, सोबत शिवीगाळदेखील करायचा. त्याच्या या छळामुळे शिल्पी कंटाळली होती. या सर्व त्रासातून तिला मुक्तता हवी होती. याच कारणामुळे तिनं नितीशची गळा दाबून हत्या केली. शिल्पी मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी होती. शिल्पी व नितीशची दोन मुलं आहे. दोघंही मुलं शिल्पीच्या आईवडिलांजवळ राहतात. तर नवी दिल्लीत शिल्पी व नितीश राहत होते