नांदेडमध्ये एका डॉक्टर तरुणीची सासरच्यांनी हत्या केल्याचं उघड झालंय. धक्कादायक म्हणजे आंतरजातीय प्रेमविवाहाच्या विरोधातून ही हत्या झाल्याचं समोर आलंय.
नांदेड शहरातल्या गणेश नगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर चेतना इंगळे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. डॉक्टर चेतना यांचा नांदेडमधील विकास केंद्रे यांच्याशी आंतरजातीय लग्न झालं होतं. हे लग्न केंद्रे कुटुंबीयांना मान्य नव्हतं. चेतनाला सासरचे त्रास देत असल्याचं ती तिच्या कुटुंबीयांना सांगत होती. रविवारी चेतना अमरावतीहून नांदेडच्या गणेश नगरच्या घरी आली. त्यानंतर काही वेळातच तिचा संशयास्पद मृत्यू झाला. चेतनाची हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय.
या प्रकरणी नांदेड पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चेतनाच्या नवऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केलाय.
गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतनाच्या सासरचे सगळेच फरार झालेत. उच्चशिक्षित डॉक्टर तरुणीचा जात वेगळी असल्याने छळ करुन झालेल्या हत्येमुळे जात कधीच जात नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.
No comments:
Post a Comment