Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, July 22, 2017

हे आहेत जगातील सर्वात क्रूर व निर्दयी 10 हुकूमशहा, हिटलरचा क्रमांक 3


'इंटरनॅशनल डेस्क- ब्रिटनचे प्रिन्स विलियम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या पोलंड दौ-यावर आहेत. या दरम्यान रॉयल कपल तेथील हिटलरने बनविलेल्या टॉर्चर कॅम्पला (छळछावणी) भेट दिली. रॉयल कपलने या कॅम्पला भेट देताच दुस-या महायुद्धातील सर्वात वेदनादायी घटना असल्याचे म्हटले. 1933 मध्ये जर्मनी देशाची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अडॉल्फ हिटलरने तेथे एक वांशिक साम्राज्य बनवले. हिटलरने सहा वर्षात सुमारे 60 लाख ज्यू लोकांची हत्या घडवून आणली. यात 15 लाख मुलांचा समावेश होता.
हिटलर हा जगातील तिस-या क्रमांकाचा सर्वात क्रूर, हिंस्त्र व निर्दयी हुकुमशहांपैकी एक होता. त्याच्यापेक्षाही क्रूर तर चीनचा मॉओ आणि रशियाचा स्टॅलिन होता. मॉओने सहा कोटी लोकांचा तर स्टॅलिनने ४ कोटी लोकांचा जीव घेतला. हिटलरने तीन कोटी लोकांना मारून टाकले. विसावे शतक तर मोठ्या प्रमाणात हत्याकांड व मृत्यूचे साक्षीदार बनले. अनेक नरसंहार पाहणार्‍या या शतकात दोन महायुद्धे झाली. नाझी, फॅसिस्ट, कम्युनिस्ट व लष्करी हुकूमशहांनी 10 कोटी लोकांची हत्या केली. जाणून घेऊया सर्वात मोठे नरसंहार घडवणार्‍या अशाच दहा निर्दयी हुकूमशहांबाबत...

माओ-त्से-तुंग- चीन (1949-76), राजवट - कम्युनिस्ट, बळी - 6 कोटी-
 
चीनचे तथाकथित कर्णधार म्हटले जाणारे माओ-त्से-तुंग इतिहासातील सर्वात मोठे खुनी आहेत. त्यांना ‘माओ झेडाँग’ या नावानेही ओळखले जाते. देशात कम्युनिस्ट राजवट लागू झाल्यानंतर त्यांनी अनेक लोकांची हत्या घडवून आणली होती. त्यातील बहुतांश लोक चिनी होते. साठच्या दशकात गेट्र लीप फॉरवर्ड या सांस्कृतिक क्रांतीतून पसरलेल्या उपासमारीमुळे व छळछावणीतील अत्याचारामुळे अनेक लोक 
जोसेफ स्टॅलिन- सोव्हिएत संघराज्य (1929-53), राजवट - कम्युनिस्ट, बळी - 4 कोटी
 
लेनिनचा वारसदार स्टॅलिन सामूहिक हत्येबाबत माओनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. लेनिनच्या मृत्यूनंतर 1924 मध्ये त्याने सत्ता हस्तगत केली आणि हळूहळू पक्षातील सर्व विरोधकांना ठार मारले. एवढेच नव्हे तर 1939 मध्ये त्याने आपल्याच हत्येचा कट रचल्याचा आरोप करत 13 रशियन नेत्यांना मृत्युदंड दिला. स्टॅलिनने युक्रेनमध्ये लाखो सधन शेतकर्‍यांची हत्या केली किंवा त्यांच्याकडून बळजबरी जमीन हिसकावून 
अँडॉल्फ हिटलर- जर्मनी (1933-45), राजवट- हुकूमशाही, बळी-3 कोटी-
 
अँडॉल्फ हिटलरच्या नाझी पक्षाने केलेला होलोकॉस्ट (नरसंहार) मानवतेच्या इतिहासाला लागलेला सर्वात मोठा डाग आहे. दुसर्‍या महायुद्धात करण्यात आलेल्या नरसंहारात ज्यू लोकांना लक्ष्य बनवण्यात आले होते. हिटलरच्या आदेशावरून लष्कराने पोलंडवर आक्रमण केले. फ्रान्स व ब्रिटनने पोलंडला सुरक्षा देण्याचे वचन दिले होते. त्यामुळे त्यांनी र्जमनीविरुद्ध युद्ध पुकारले. अशा प्रकारे दुसर्‍या महायुद्धास सुरुवात झाली. या युद्धात अमेरिका सामील झाल्यानंतर हिटलरचे सैन्य डगमगू लागले होते. एप्रिल 1945 मध्ये रशियाने हल्ला चढवल्यानंतर हिटलरने आत्मघात केला. कोट्यवधी लोकांचा बळी गेला आणि युरोप उद्ध्वस्त झाला. 
 
हायडेकी टोजो- जपान (1941-45), राजवट - लष्करी हुकूमशाही, बळी - 50 लाख-
 
टोजो जपानचा इंपेरियल जपानी सेनेचा जनरल व दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानचा पंतप्रधान होता. पर्लहार्बर हल्ल्यास जबाबदार असलेल्या टोजोमुळे जपान व अमेरिकेत युद्ध सुरू झाले होते. युद्ध संपल्यानंतर टोजोला अटक करून जपानी युद्ध गुन्ह्यासाठी इंटरनॅशनल मिलिट्री ट्रायब्युनल फॉर द ईस्टने 23 डिसेंबर 1948 रोजी फाशीची शिक्षा दिली. टोजोला चीन, फिलिपाइन्स व इंडोनेशियातील लाखो 
इनवर पाशा- तुर्की (1915-20), राजवट - लष्करी हुकूमशाही, बळी - 20 लाख-
 
इनवर पाशा नावाने प्रसिद्ध असलेल्या ऑटोमन तुर्कीच्या या लष्करी शासकाचे नाव इस्माइल इनवर होते. बाल्कन युद्ध व पहिल्या महायुद्धात तो प्रमुख नेता होता. त्याला युद्ध गुन्हे व अर्मेनिया नरसंहार, ग्रीक नरसंहार व अश्शुनियन नरसंहारासोबतच मोठय़ा प्रमाणात लोकांच्या हत्येस जबाबदार धरले जाते. त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रकारचे दावे करण्यात येतात. त्याच्या एका सहकार्‍यानुसार, लढाईत एक गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता.
पॉल पॉट- कंबोडिया (1975-79), शासन - कम्युनिस्ट, बळी - 20 लाख-
 
पॉल पॉट डेमोक्रेटिक कंपुचियाचा पंतप्रधान होता. एप्रिल 1975 मध्ये कंबोडियाचा नेता बनल्यानंतर त्याने अग्रेरियन समाजवाद लागू केला. त्याने शहरातील रहिवाशांना सामूहिक शेतीत वेठबिगार म्हणून काम करण्यास भाग पाडले. कुपोषण, बिगारी, वैद्यकीय सेवेचा अभाव व फाशी या कारणांमुळे 21 टक्के कंबोडियाची लोकसंख्या संपली. त्याच्या कार्यकाळात 20 ते 40 लाख मृत्युमुखी पडल्याचे बोलले जाते.
याकुबू गोवोन- नायजेरिया (1967-70), राजवट - लष्करी हुकूमशाही, बळी - 10 लाख-
 
याकुबू 1967 ते 1970 दरम्यान नायजेरियाच्या लष्करी सरकारचा प्रमुख होता. त्याने एक लष्करी उठावानंतर तख्तपालट करून सत्ता हस्तगत केली होती. याकुबूने आपल्या राजवटीत 1966 ते 1970 दरम्यान बायफ्रा चळवळ (औपचारिकरीत्या पूर्व क्षेत्र नायजेरियातून वेगळे करण्याची मागणी) व नायजेरियेन यादवी युद्धाचे यशस्वी दमन केले होते. त्यात जवळपास दीड लाख सैनिक व 10 लाख नागरिक 

किम इल संग- उत्तर कोरिया (1948-94), राजवट- कम्युनिस्ट, बळी - 16 लाख-
 
कोरियन कम्युनिस्ट नेता किम इल संगने 1948 ते 1994 पर्यंत आजीवन शासन केले. 1948 ते 1972 पर्यंत पंतप्रधान व 1972 ते 1994 पर्यंत तो राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या कार्यकाळात किमान 16 लाख नागरिक व राजकीय विरोधक जीव गमावून बसले. दक्षिण कोरियावर हल्ला करण्याच्या निर्णयात सोव्हिएत संघराज्याचा हात नव्हता, हे अभिलेखीय सामग्रीवरून सिद्ध होते. दक्षिण कोरियावर हल्ला करण्यास किमनेच मदत केली होती.

मेंगिस्तू हेली मरियम- इथिओपिया (1974-78), राजवट - कम्युनिस्ट लष्करी शासन, बळी - 15 लाख-
 
मेंगिस्तू हेली मरियम इथिओपियन राजकारणी आहे. 1974 ते 1978 दरम्यान तो डर्ग नावाच्या कम्युनिस्ट लष्करी सरकारमध्ये महत्त्वाचा अधिकारी होता. त्याने पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी व डर्गविरोधात चालणार्‍या विरोधी गटांच्या हिंसक मोहिमेस (ज्यास इथिओपियन रेड टेररही म्हणतात) पायबंद घातला. इथिओपियातील यादवी युद्ध संपल्यानंतर तो झिंबाब्वेस पळून गेला. त्याच्या गैरहजेरीत इथिओपियन न्याया
किंग लियोपोल्ड द्वितीय- बेल्जियम (1865-1905), राजवट- कांगोमध्ये वसाहतवादी शासन, बळी - 80 लाख-
 
बेल्जियमचा राजा लियोपोल्ड द्वितीयने 17 डिसेंबर 1865 रोजी सत्ता मिळवली. त्यास प्रामुख्याने कांगो फ्री स्टेटच्या वैयक्तिक प्रकल्पाचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्याने कांगोवर आपला दावा करण्यासाठी वेल्सचे र्जनालिस्ट व दक्षिण आफ्रिकेत एक्सप्लोरेशनसाठी प्रसिद्ध हेन्री मॉटोन स्टॅनलीचा वापर केला. वैयक्तिक हितासाठी त्याने कांगोला निर्दयीपणे चिरडले. सुरुवातीला कांगोमधून हस्तिदंतांचा साठा करण्यात आला आणि नंतर रबराचे दर वाढल्यानंतर रबराच्या झाडांचा चीक गोळा करण्यासाठी लोकांना भाग पाडले.
 

No comments:

Post a Comment