Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, August 22, 2017

ग्रहणातील सूर्यालाही डोनाल्ड ट्रम्पनी वटारले उघड्या डोळ्यांनी, सोशल मीडियावर खिल्ली


वॉशिंग्टन, दि. 22 - सुर्यग्रहण पाहताना एक महत्वाचा नियम असतो तो म्हणजे पुर्वकाळजी न घेता आकाशाकडे पाहू नये. चष्मा न वापरता सुर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकतं असं शास्त्रज्ञ सांगतात. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शास्त्रज्ञांचा दावा खोडून काढत आपण काहीही करु शकतो हे दाखवून दिलं आहे. सुर्यग्रहण पाहण्यासाठी पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या बाल्कनीत आले असता त्यांनी थेट सुर्याकडे पाहत नजर भिडवली. इतकंच नाही तर तिथे उपस्थित समर्थकांनाही आपण पाहत असल्याचा इशारा करत होते. 
सुर्यग्रहण पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आले तेव्हा त्यांच्यासोबत पत्नी मेलानिया आणि मुलगा बॅरॉन ट्रम्प उपस्थित होता. मेलिनिया यांनी चष्मा घातलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी येताच समर्थकांनी हात दाखवत थेट आकाशाकडे पाहिले. आपण आकाशाकडे पाहत असल्याचं ते इशा-याने सांगतही होते. बरं एकदा तर तीनवेळा त्यांनी हे धैर्य करुन दाखवलं. नंतर मात्र त्यांनी डोळ्यांवर चष्मा घालून पत्नी आणि मुलासोबत संपुर्ण सुर्यग्रहण पाहिलं. 
डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर मात्र चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. 

पाकिस्तानसह या देशांमध्ये आधीपासूनच 'बॅन' आहे ट्रिपल तलाक, बंदी आणणारा इजिप्त होता जगातला पहिला देश

नवी दिल्ली, दि. 22 - बहुचर्चित तिहेरी तलाक प्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आणि तिहेरी तलाकवरसहा महिन्यांची बंदी घातली. तसंच केंद्र सरकारला सहा महिन्यात यासंबंधी कायदा बनवण्याचा आदेश दिला.  पण भारताआधीच जगभरात अनेक देशांमध्ये ट्रिपल तलाकवर बंदी आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही ट्रिपल तलाकवर बंदी आहे. 
पाकिस्तानमध्ये 1961 मध्येच तीन तलाकवर बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानसह बांगलादेश, सीरिया यांसारख्या अनेक मुस्लिम देशांचाही समावेश आहे. ट्रिपल तलाकवर बंदी घालणारा इजिप्त हा जगातील पहिला देश होता. येथे 1929 मध्येच येथे ट्रिपल तलाकला घटनाविरोधी ठरवून बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर 1929 मध्येच सूडान या देशाने इजिप्तचं अनुकरण केलं. 
या देशांमध्ये बॅन आहे ट्रिपल तलाक - 
पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया, मोरक्को, कतर, सूडान. 
तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया- 
- ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो.
- या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो.
- वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं.
- तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.
- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत.
- तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .
- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल  लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात. 
- तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते.
- तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे.
- काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.
काय आहे नेमके प्रकरण?
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.
 तिहेरी तलाकविरोधातील याचिका
सात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.

पाकिस्तान जर दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर परिणाम भोगावे लागतील - डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन, दि.22 -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे.  दहशतवाद्यांना पाकिस्तान अशाचप्रकारे आश्रय देत राहिल्यास अमेरिका शांत बसून राहणार नाही, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात नव्या धोरणांची घोषणादेखील केली.  
गेल्या 16 वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहेत.  याठिकाणाहून सैन्याला माघारी बोलावण्यात आले तर यामुळे दहशतवादी कारवायांना अधिक गती मिळेल, असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.
'पाकिस्तान दहशतवाद्यांचं आश्रयस्थान'
पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे.  अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत.  पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला.