Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, August 22, 2017

पाकिस्तान जर दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर परिणाम भोगावे लागतील - डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन, दि.22 -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे.  दहशतवाद्यांना पाकिस्तान अशाचप्रकारे आश्रय देत राहिल्यास अमेरिका शांत बसून राहणार नाही, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात नव्या धोरणांची घोषणादेखील केली.  
गेल्या 16 वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहेत.  याठिकाणाहून सैन्याला माघारी बोलावण्यात आले तर यामुळे दहशतवादी कारवायांना अधिक गती मिळेल, असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.
'पाकिस्तान दहशतवाद्यांचं आश्रयस्थान'
पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे.  अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत.  पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला. 

No comments:

Post a Comment