Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, May 31, 2017

अय्याश शहजादा... 6 तासात 23,174,347,500 रुपये आणि 5 बायका गमावल्या

सिनई ग्रँड कॅसिनोमध्ये शिरताना याने विचारही केला नसेल की आज त्याचे भाग्य इतके रुसलेले आहे तो केवळ सहा तासात 23,174,347,500 रुपये आणि पाच बायका गमावून बसेल.  ड्रग आणि गेम्बलिंगसाठी कुख्यात प्रिन्सचा प्रत्येक डाव त्यावर भारी पडला.

नऊमधून पाच बायकांवर डाव
या कॅसिनोत आठवडाभर राहिल्यानंतर प्रिन्स अनलिमिटेड स्टेक्स पोकर टेबल वर पोहचला. 1.350 बिलियन रियाल्स गमावल्यानंतर प्रिन्सकडे काही उरले नाही तर त्याने आपल्या नऊपैकी पाच बायकांवर डाव लावला, परंतू त्यावेळी भाग्य आणि प्रिन्समध्ये जणू 36 चा आकडा होता. तो पाची बायकांना गमावून बसला.
 
पराभवानंतर तिथून निघून गेला
कॅसिनोचे डायरेक्टर अली शमून यांनी सांगितले की बायका गिरवी ठेवल्या, आणि गमावल्यानंतर तो तिथून निघून गेला. अनेकदा अशा परिस्थितीत लोकं आपले उंट किंवा अश्व डावावर लावतात. हरलेली रक्कम सोडवतात. परंतू असे पहिल्यांदाच झाले की कोणी आपल्या बायका गमावून त्यांना सोडून निघून गेला असेल. कोणत्याही महिलेला गहाण ठेवणे किंवा विकणे मिडिल ईस्ट देशांमध्ये अजूनही कायदेशीर आहे.
 
बायकांचे काय झाले
प्रिन्सच्या या कृत्यामुळे त्याच्या बायका आणि सरकारादेखील लाज वाटत आहे. प्रिन्सच्या बायकांना सौदी अरबाला पुन्हा पाठवण्यात येईल की नाही हे स्पष्ट नाही. सौदीची रॉयल फॅमिली पैसा चुकवून प्रकरण संपवेल अशी ही शक्यता आहे. आणि असे झाले नाही तर त्यांना यमन किंवा कतर येथे बोली लावून विकण्यात येईल.
 
बदनाम प्रिन्स
प्रिन्स मानेद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल्ला अजीजी अल सऊद आधीही आपल्या कृत्यांमुळे बदनाम झालेला आहे. 2015 साली यावर एका पुरूष आणि मोलकरणीसोबत संबंध बनवण्याचा आरोप लावण्यात आला होता. कोकीन घेऊन महिलांना जीवेमारण्याची धमकीही हा देत असे. तसेच आता प्रिन्सचे खूप नुकसान झाल्यामुळे त्याला सामान्य जीवन जगावे लागेल असा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment