Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, June 1, 2017

जेवण देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्‍कार




लखनऊ :  ऑनलाईन 
किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये लिफ्टमन आणि त्‍याच्या साथीदारांनी मिळून एका महिलेवर सामूहिक  बलात्‍कार केला. ही घटना बुधवारी रात्री घडली. पीडित महिला आपल्‍या पतीच्या उपचारांसाठी केजीएमयू या हॉस्‍पिटलमध्ये आली होती. लिफ्टमन शिवकुमारने या महिलेला जेवण देण्याच्या बहाण्याने आपल्‍या खोलीमध्ये नेले. याठिकाणी त्‍याचे दोन साथीदारही होते. यावेळी या तिघांनी महिलेला बंदी करून तिच्यावर सामूहिक  बलात्‍कार केला. 
पीडित महिलेकडून या तिघांविरोधात गुरूवारी पोलिस स्‍टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी शिवकुमारला अटक केली असुन, त्‍याच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. 
उत्‍तरप्रदेशमधील किंग जॉर्ज चिकित्‍सा विश्वविद्यालय हे सर्वात मोठे हॉस्‍पिटल मानल जाते. २०१६ मध्ये या हॉस्‍पिटलला देशातील बेस्‍ट मेडिकल कॉलेजमध्ये सातवा रॅक मिळाला होता. युपीमधील सर्वात जास्‍त टीबीचे रूग्‍ण केजीएमयूमध्ये उपचारांसाठी येत असतात.

No comments:

Post a Comment