MSBSHSE HSC Class results 2017: बारावीचा निकाल जाहीर
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे. वेबसाईटवरही हा निकाल जाहीर करण्यात आला.
राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी 1 पासून ऑनलाईन निकाल पाहता येतील. तर गुणपत्रिका 9 जून रोजी दुपारी 3 नंतर संबंधित महाविद्यालयांमध्ये मिळतील.
दरम्यान, यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
याशिवाय 95.20 टक्क्यांसह कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. तर सर्वात कमी म्हणजेच 88.21 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
राज्याचा विभागनिहाय निकाल
कोकण – 95.20%
कोल्हापूर – 91.40%
पुणे – 91.16%
औरंगाबाद – 89.83%
अमरावती – 89.12%
नागपूर – 89.05%
लातूर – 88.22 %
नाशिक – 88.22%
मुंबई – 88.21%
कोणत्या शाखेचा किती निकाल?
विज्ञान – 95.85%
कला – 81.91%
वाणिज्य – 90.57%
No comments:
Post a Comment