Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, June 10, 2017

रमजानची भेट! गावात स्वखर्चातून बांधली 515 शौचालयं



बिजनोर, दि. 10- रमजानचा महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव निष्ठेने उपवास करतात तसंच रमजानच्या महिन्यात चांगली कामसुद्धा नितक्याच निष्ठेने केली जातात. याचंच उत्तम उदाहरण उत्तरप्रदेशातील बिजनोरमध्ये पाहायला मिळालं. गावाला हागणदारी मुक्त करण्यासाठी तेथील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला आहे. खरंतर देशाला हागणदारी मुक्त करण्यासाठी सरकारनेकडून प्रयत्न केले जातं आहेत तसंच ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदतसुद्धा करते आहे. पण सरकारकडून आलेला निधी न घेता आपापसात पैसे जमा करून बिजनोरमधून मुस्लिम बांधवांनी शौचालयं बांधली आहेत. 
'घरात शौचालय बांधणं यापेक्षा दुसरं कोणतंही काम महत्त्वाचं नाही, असं सांगत उत्तर प्रदेशातील मुस्लिमबहूल गावानं सरकारने दिलेली साडे सतरा लाखांची आर्थिक मदत नाकारली आणि संपूर्ण गाव स्वतःच्या पैशांनी हागणदारी मुक्त केलं आहे. 
उत्तर प्रदेशातील असलेलं साडे तीन हजार लोकवस्तीचं बिजनोर गाव ज्यामध्ये 661 कुटुंब राहतात. पण त्यापैकी फक्त १४६ लोकांच्या घरात शौचालयं होती. गावातील इतर लोक  उघड्यावरच शौचालयासाठी जात होते. गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सरपंचाला शौचालय बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याला सांगितलंही होतं. यानंतर सरपंचाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता.  या प्रस्तावानुसार सरकारने  साडे सतरा लाख रुपये मंजूर करून ते पैसे सरपंचाच्या खात्यामध्ये जमा केले होते. पण गावकऱ्यांनी पैसे घ्यायला पूर्णपणे नकार दिला. 
 
सरकारकडून शौचालयासाठी मिळणारा निधी न घेता स्वखर्चाने संपूर्ण गावात शौचालय बनवणारं बिजनोर हे पहिलं गाव ठरलं आहे, अशी माहिती सीडीओने दिली आहे.  महिलांसह गावातील सर्व जण स्वतःच्या घरात शौचालय बनवण्यासाठी तयार होते. ज्या लोकांकडे शौचालय बनवण्यासाठी पैसे नव्हते अशा लोकांना आम्ही सर्वांनी मिळून आर्थिक मदत केली, असं बिजनोरच्या सरपंचांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment