Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, June 6, 2017

अँड्रॉईड फोनला जोडा की-बोर्ड



मोबाईल फोनवर टायपिंग करण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. परंतु तरीही मोबाईलवर खूप वेगाने टायपिंग करता येत नाही. फोनवर जलद गतीने ऑपरेटिंग करण्यासाठी की-बोर्ड जोडता आला तर किती बरे होईल, असा विचार सर्वांच्याच मनात येऊन जातो. आता ते शक्‍य झाले आहे. 
यूएसबी-ओटीजीची मदत 
अँड्रॉईड फोन कमी जाडीचे असतात. त्यामुळे या फोनच्या पोर्टचा वापर यूएसबी पोर्टसारखा करता येत नाही. त्यामुळे आपला फोन यूएसबी पोर्ट म्हणून वापरण्यासाठी एका ऍडॅप्टरची गरज असते. या ऍडॅप्टरला "ओटीजी' किंवा "यूएसबी ऑन द गो' असे म्हटले जाते.
ओटीजीची एक बाजू मायक्रो यूएसबी असते आणि दुसऱ्या बाजूला यूएसबी पोर्ट. मायक्रो यूएसबी आपल्या फोनच्या चार्जिंग स्लॉटला लावा आणि यूएसबीच्या बाजूला की-बोर्ड लावावा. एकदा की-बोर्ड कनेक्‍ट झाला, की आपल्याला फोनवरून एक्‍सटर्नल की-बोर्ड सेटिंग करावे लागेल. त्यासाठी अँड्रॉईड फोनच्या नोटिफिकेशन ड्रॉवरमध्ये सिलेक्‍ट किबोर्ड लेआऊटचा पर्याय असतो. त्यावर क्‍लिक करून डिफॉल्ट निवडा. आपल्या हवी तशी सेटिंग्जही करू शकता. समजा की बोर्ड जोडल्यावर की-बोर्ड नोटिफिकेशन मिळाले नाही तर सेंटिंग्जमध्ये जाऊन पर्सनलमध्ये लॅंग्वेज अँड इनपुट वर क्‍लिक करा. त्यानंतर की-बोर्ड आणि इनपुट मेथडवर जाऊन क्‍लिक करा. हा पर्याय निवडला की यूएसबी की-बोर्ड अँड्रॉईड फोनसोबत जोडला जाऊन काम करता येईल.  

No comments:

Post a Comment