Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, June 10, 2017

मधुचंद्राच्या रात्री नववधुने फोडले नवरदेवाचे बिंग; 'किन्नर' असल्याचा केला आरोप



जबलपूर- एका नववधुने मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाचे बिंग फोडले. नवरदेव 'किन्नर' असल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. सासरच्या लोकांनी आपली फसवणूक केली असून त्यांनी 20 लाख रुपये हुंडा घेतल्याचाही आरोप नववधुने पोलिसांना सांगितले आहे.

काय आहे हे प्रकरण?
- घमापूर पोलिसांनी सांगितले की, पटेल नगरात राहाणारी साधना द्विवेदी हिचा विवाह इंद्रा नगर येथे राहाणारे रामसंजीवन तिवारी यांचा मुलगा अभिषेक तिवारीसोबत 2 जूनला संपन्न झाला.
- गेल्या मार्चमध्ये दोघांचा विवाह जुळला होता. 5 एप्रिलला साखरपुडा झाला. 51 हजार रोख, 16 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 10 हजार रुपये कपड्यांवर खर्च करण्‍यात आले होते. हॉटेलचे बिल साधनाच्या सासरच्या लोकांनी खर्च केले होते.

उधारउसणवारी घेऊन दिले 11 लाख
- 2 जूनला तिलक समारंभात अभिषेकच्या आई-वडिलांनी साधनाच्या आई-वडिलांकडे 15 लाख रुपयांची डिमांड केली. हातापाया जोडून रामसंजीवन तिवारी हे 11 लाख रुपये घेण्यास तयार झाले.
- साधनाच्या वडिलांनी नातेवाईकांकडून उधारउसणवारी घेऊन रामसंजीवन यांना 11 लाख रुपये दिले होते.

मधुचंद्राच्या रात्री फुटले बिंग...
- लग्न झाल्यानंतर साधना सासरी आली. मधुचंद्राच्या रात्री पती अभिषेक किन्नर असल्याचे समजले. तिने ही बाब आई-व‍डिलांना सांगून पोलिसांत सासरच्या लोकांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.
- सासरच्या लोकांनी 20 लाख रुपये हुंडा घेतल्याचाही आरोप साधनाने केला आहे. 
- नवरदेवाचे बिंग फुटल्याने 6 जूनचे रिसेप्शनही रद्द करण्‍यात आले होते.
- पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

No comments:

Post a Comment