Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 19, 2017

रेणापुर शिवारात गांजाने भरलेले पोते फेकून तस्कर फरार

https://www.youtube.com/watch?v=PJqCmC_4hQ8&feature=youtu.be


[अहमद भाई करखेलीकर ]



नांदेड :- जिल्ह्यातील माै.रेणापुर ता.भोकर शिवारातील उसाच्या मळ्यात गांजाने भरलेले एक नायलाॅन पोते फेकूण गांजा तस्कारांनी एका कारने पलायन केले असून त्या पोत्यातील १७ हजार २०० रुपये किमतीचा ८ किलो ६०० ग्रॅम गांजा भोकर पोलीसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी भोकर पोलीसांत अज्ञात तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमायतनगर ते भोकर मार्गाने एका कार मधून गांजाची तस्करी केल्या जात असल्याची गोपनिय माहिती १८ जून २०१७ रोजी सकाळी भोकर पोलीसांना मिळाल्यावरुन  पो.नि.संदिपान शेळके,पो.उप.नि.सुशिल चव्हाण,जमादार सी.जी.पांचाळ,पो.काॅ.प्रकाश श्रीरामे,पो.काॅ.गोविंद साबळे सी.एम.साखरे,जिप चालक राजू भूताडे यांनी सकाळी १० वाजताच्या दरम्यान भोकर – किनवट रस्त्यावर साफळा रचून पाळत ठेवली.परंतू या साफळ्याची माहिती त्या गांजा तस्करांना मिळाली व त्यांनी आपला मार्ग बदलला.त्यांच्या जवळील कार त्यांनी भरधाव वेगात भोकर ते दिवशी व्हाया बटाळा मार्गाने नेली. या मार्गाने गोपनिय माहिती मिळाल्याच्या वर्णनाची कार गेल्याचे समजल्यावरुन पोलीसांनी त्या मार्गाने जिपने पाठलाग केला.परंतू त्या गांजा तस्करांना पोलीस पाठलाग करत असल्याचे समजल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळील गांजाने भरलेले एक नायलाॅनचे पोते रेणापुर ता.भोकर शिवारातील एका उसाच्या मळ्यात फेकून दिले व पलायन केले.भोकर पोलीसांनी दिवशी व तेलंगणा सिमेपर्यंत पाठलाग केला.परंतू सदरील तस्करांनी ती कार अतिशय वेगाने नेली.त्यामुळे ते कोणत्या मार्गाने कुणीकडे पळाले हे समजू शकले नाही. रेणापुर येथील प्रत्यक्षदर्षी काही शेतक-यांनी सदरील पोते फेकून कारमधील लोकांनी पलायन केल्याचे पाहिले व काही वेळाने रेणापुर येथील रहिवासी असलेले पत्रकार राजेश चंद्रे यांनी भोकर पोलीसात तक्रार दिली की रेणापुर च्या सरपंच मुक्ताबाई गायकवाड यांच्या मळ्यातील उसात उग्र वास येत असलेले कसल्यातरी वनस्पतीने भरलेले एक नायलाॅनचे पोते फेकलेले आहे.यावरुन भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके,पो.नि.संदिपान शेळके,पो.उप.नि.सुशिल चव्हाण व पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट दिली.यावेळी त्यांनी त्या नायलाॅनच्या पांढ-या रंगाच्या पोत्यात काय आहे हे तपासले असता त्यात पाला,काड्या,फुल,बोंड अशा अवस्थेत असलेला गांजा निदर्शनास आला.तो गांजा असल्याची खात्री झाल्यामुळे याबाबद राजपत्रीत महसूल अधिकारी तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांना कळविण्यात आले व त्यांना सरकारी पंच देण्याची विनंती केली असता त्यांनी नायब तहसिलदार एम.एस.जगताप,तलाठी व्ही.बी.मुळेकर,तलाठी शेख लतिफ यांना घटनास्थळी पाठविले.या पंचासमक्ष घटनास्थळी भोकर पोलीसांनी पंचनामा केला व त्यांच्या समोरच त्या गांजाचे वजन केले.त्या वजनानुसार तो गांजा ८ किलो ६०० ग्रॅम असा भरला व त्याची अंदाजे किंमत १७ हजार २०० रुपये असल्याचे नमुद करण्यात आले.सदरील गांजा जप्त करण्यात आला आहे.                                                                                                    
या प्रकरणी पो.उप.नि.सुशिल चव्हाण यांनी भोकर पोलीसांत फिर्याद दिल्यावरुन त्या पांढ-या रंगाच्या कार मधील अज्ञात तस्करांविरोधात आमली पदार्थ ,अन्न व द्रव्य अधिनियम कायदा १९८५ नूसार कलम ८ , २० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.संदिपान शेळके हे करत आहेत.

No comments:

Post a Comment