मुंबई: शेतकऱ्यांच्या संपाला यश येण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्य सरकार अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने महाराष्ट्र तापलेला असताना दुसरीकडे अल्प कर्जधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार अभ्यास करत असल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा दुष्काळामुळे नुकसान होऊन कर्ज थकले आहे, त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करुन, त्यांना नव्याने कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याद्वारे महाराष्ट्र राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 31 लाख शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
अर्थात ही योजना तातडीने अंमलात येणार नसून, त्यासाठी राज्य सरकारमधली तज्ज्ञ मंडळी यावर अभ्यास करत असून, या योजनेला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment