Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, June 6, 2017

पै-पै जमवून केलेली बचत पोस्टात पोहोचलीच नाही, पोस्टमनच्या मृत्यूनंतर उघड झाला घोटाळा

वेरूळ -उज्‍ज्‍वल भविष्‍यासाठी सर्वजण कुठे ना कुठे गुंतवणूक करतात. त्‍यातल्‍या त्‍यात पोस्‍टातील गुंतवणूक म्‍हणजे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. परंतु जगप्रसिद्ध वेरूळ (ता. खुलताबाद) येथील पोस्ट कार्यालयात सुरक्षित गुंतवणुकीच्‍या आशेने विविध ठेव योजनांमध्‍ये ग्रामस्‍थांनी केलेल्‍या गुंतवणुकीत अपहार झाल्‍याचे वृत्‍त आहे. घोटाळ्याचा निश्चित आकडा समोर आलेला नसला तरी याप्रकरणी वरिष्‍ठ अधिकाऱयांनी कुठलीही माहिती देण्‍यास नकार दिला आहे. या ठेवींमध्‍ये आवर्ती ठेव, ज्‍येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक प्राप्ती योजना, मुदत ठेव योजना, किसान विकासपत्र यासह विविध योजनांचा समावेश असल्‍याची माहिती आहे.
जगप्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असल्‍यामुळे वेरुळातील ग्रामस्‍थ अनेक छोटे-मोठे व्‍यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. या व्‍यवसायातून येणाऱया नफ्याची बचत पोस्‍टाच्‍या विविध ठेव योजनांमध्‍ये करतात. यात 200 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत प्रति महिना बचत करणारे अनेक ठेवीदार आहेत.
याची एजन्‍सी सुनीता राजेंद्र वरकड यांच्‍या नावावर असून त्‍यांचे पती राजेंद्र वरकड हे वेरूळ पोस्ट कार्यालयात पोस्टमन म्हणून कार्यरत होते. पोस्टाच्या विविध बचत योजनांचे पैसे जमा करण्याचे काम राजेंद्र वरकड यांच्याकडे होते. पोस्टाचे कर्मचारी असल्याने राजेंद्र वरकड यांच्यावर विश्वास होता. याचा फायदा घेत राजेंद्र वरकड यांनी अनेकांना पोस्‍टात खाते असल्‍याचे भासवून त्‍यांच्‍याकडून वेळोवेळी ठेवींच्‍या नावाखाली रक्‍कम गोळा करून त्‍यांना बोगस पावत्‍या दिल्‍या. बुधवारी (दि. 24) राजेंद्र वरकड यांचा मृत्‍यू झाल्‍याने काही जण आपापल्‍या पैशांची चौकशी करण्‍याकरिता पोस्‍ट ऑफि‍सात गेल्‍यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. 
या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळताच सहायक डाकघर अधीक्षक मनीष नवलू यांनी पोस्टमास्तर बी. डी. रेगुलवार आणि डाक सहायक जी. एस. कदम यांना तत्काळ तोंडी निलंबित केले असून अद्याप लेखी आदेश दिलेले नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती सांगण्यास नकार दिला.
- संतोष दिगंबर थोरात या व्यावसायिकाने एकूण २ लाख रुपये फिक्स डिपॉझि‍ट केले आहेत. त्यांचे पासबुकावर पोस्टाचे सही-शिक्के आहेत. परंतु त्या बुकाची पोस्टात नोंदच नाही.
- असाच प्रकार संतोष कटारे या हॉटेल व्‍यावसायिकाबाबतही घडला आहे. त्‍यांनी एफ.डी. व एम.आय.एस. मध्ये तब्‍बल ९ लाख रुपये विविध खात्यांवर ठेवले आहेत. पूर्ण आयुष्याची कमाई आता शून्य झाल्‍याची प्रतिक्रिया त्‍यांनी दिली.



No comments:

Post a Comment