नांदेड/ प्रतिनिधी
शहरातील दिलीपसिंघ कॉलनी गोवर्धनघाट भागातील रहिवासी व सेवानिवृत्त जि़प़शिक्षिका श्रीमती रुक्मिणीबाई गणपतराव जाधव पाटील यांचे अल्पशा आजाराने ६ जून रोजी दुपारी दोनच्या सुमारास निधन झाले़ त्या ७४ वर्षांच्या होत्या़ त्यांच्या पश्चात तीन पुत्र, मुलगी,सुना,जावाई,नातवंडे असा परिवार आहे़ त्यांची अंत्ययात्रा ७ जून रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरुन गोवर्धनघाटावर नेण्यात येणार आहे़ विष्णुपुरीच्या एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल इंजिनिरिंगचे विभाग प्रमुख प्रकाश जाधव पाटील, मातोश्री कॉलेजमधील कर्मचारी किरण जाधव, यशवंत महाविद्यालयातील प्रा,श्रीकांत जाधव यांच्या त्या मातोश्री होत़
No comments:
Post a Comment