Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, June 8, 2017

भारत एकाचवेळी पाकिस्तान आणि चीनचा सामना करण्यास तयार - लष्करप्रमुख



नवी दिल्ली, दि. 8 - भारतीय लष्कर एकाचवेळी देशाबाहेरील आणि देशांतर्गत धोक्यांशी सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज असल्याचं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितलं आहे. शेजारी राष्ट्रांशी दोन हात करण्यासाठी भारतीय लष्कर पुर्णपणे तयार असल्याचा विश्वास बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे. भारतीय लष्कर एकाचवेळी चीन, पाकिस्तान आणि देशांतर्गत धोक्यांचा सामना करण्यासाठी तयार असल्याचं बिपीन रावत बोलले आहेत. 
 
जम्मू काश्मीरमधील परिस्थिती लवकरच सुधारेल असंही लष्करप्रमुख बिपीन रावत बोलले आहेत. बिपीन रावत यांनी यावेळी पाकिस्तान तरुणांना सोशल मिडियाच्या माध्यमातून भडकावत असल्याचा आरोपही केला आहे. 'पाकिस्तान सोशल मीडियाचा वापर करत काश्मीरमधील तरुणांमध्ये चुकीची माहिती पसरवत आहे', असं बिपीन रावत बोलले आहेत. राज्यात अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत असून यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 
बिपीन रावत बोलले आहेत की, 'छेडछाड करण्याच आलेले व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवून पाकिस्तान राज्यातील तरणांना भरकटवत आहे. यासाठी पाकिस्तानला काश्मीर खो-यातील काही लोकांची साथही मिळत आहे. मेसेजच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेत सामील होणा-या तरुणांचा सत्कारही केला जातो'.
 बिपीन रावत यांनी सांगितलं की, लष्कर आधुनिकीकरणाची तयारी करत आहे.  'आम्ही नेहमीच आधुनिकीकरणाचा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला आहे. लष्कराचा शस्त्रसाठी अपग्रेड करण्यात आला आहे', अशी माहिती बिपीन रावत यांनी दिली. 'आम्ही कमी वापरात येणा-या (30 टक्के) आणि आधुनिक उपकरणे (30 टक्के) यांच्यामधील समतोल राखत आहोत', असंही त्यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment