हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मागील 1 मे पासून संपामध्ये सामील झाला असून आता शेतकरी राजाने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने यात अनेकांची झोप उडणार आहे.
शेतकरी या संपामधे मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावोगाव चे आठवडी बाजार बंद ठेऊन रोड वर भाजीपाला ,दूध ,रस्त्यावर फेकून आंदोलन करीत असल्याचे दिसत असल्याने शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत शेतकरी संप चालू ठेवणार असल्याचे दिसते.हिंगोली जिल्ह्यातील ,ताकतोडा ,केंद्रा बु , कुरुंदा ,जवळा बाजार , आदी ठिकाणच्या आठवडी बाजार बंद ठेऊन शेतकऱ्यांनी संप केला असून औंढा नागनाथ येथील गुरुवारी असणारा बाजार व सिरसम येथील सोमवारी भरणारा बाजार शेतकरी वर्गातुन बंद ठेवणार असल्याने सांगण्यात येत असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागणार आहे.उमेश पाटील हिंगोली
No comments:
Post a Comment