Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, June 1, 2017

३ जूनला ‘आप’कडून ईव्हीएम हॅकाथॉनचे आयोजन




नवी दिल्ली – ईलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हॅक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हॅकाथॉनचे आयोजित करण्यात आल्यानंतर आम आदमी पक्षाकडून आता हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जून रोजी आम आदमी पक्षाने हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचे आरोप अनेकदा आम आदमी पक्षाने केले आहेत. इतरही पक्षांनी यासोबतच ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचे आरोप केल्यामुळेच आम आदमी पक्षाने हॅकाथॉनचे आयोजन केले आहे.
आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेत ईव्हीएममध्ये सहजपणे फेरफार केली जात असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. आम आदमी पक्षाने यासाठी एका ईव्हीएमच्या माध्यमातून डेमो दाखवला होता. हॅकाथॉनसाठी आम आदमी पक्षाने वापरलेले तेच मशीन वापरले जाणार आहे. ईव्हीएमबद्दल आम आदमी पक्षाने शंका उपस्थित केल्या होत्या. पण तरीही निवडणूक आयोगाचे ईव्हीएम हॅक करण्याचे आव्हान आम आदमी पक्षाने स्वीकारलेले नाही. ईव्हीएम खोलून मदरबोर्ड दाखवला जावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाची मागणी फेटाळल्यानंतर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.
हॅकर्सला हॅकाथॉनमध्ये संपूर्ण सूट दिली जाते. हॅकाथॉनचा अर्थच तो असतो, असे आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी म्हटले. आम्हाला लोकशाहीवरील विश्वास कामय राहण्याण्यासाठी पूर्ण सूट देण्यात यावी आणि हॅकाथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी निवडणूक आयोगाने आम्हाला द्यावी. आम्हाला ईव्हीएम खोलण्याची संधीच दिली नाही, तर ईव्हीएम हॅक करता येणार नाही. ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचे १०० प्रकार असून यातील एक प्रकार आम्ही दिल्ली विधानसभेत करुन दाखवला होता, असेदेखील संजय सिंह यांनी म्हटले.

No comments:

Post a Comment