Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, June 29, 2017

पत्रकार व्हायचंय

                      पत्रकार व्हायचंय

भारतात आयटी नंतर सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून माध्यम क्षेत्राने आली ओळख निर्माण केली आहे. लोकांपर्यंत पोचण्यासाठी अनेक प्रसारमाध्यमे उपलब्ध झाली आहेत. या बदलत्या स्वरूपामुळे सध्या प्रसारमाध्यमांत कधी नव्हे एवढया मोठया संधी उपलब्ध झाल्या आहेत.  पत्रकारितेत करिअर करणे हे आता फार आकर्षक बनले आहे. मात्र या संधीचा वापर करून घेण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीचे शिक्षण आध्ीा घ्यायला हवे. त्यासाठी पत्रकरितेतील विविध शाखांना समृध्द करणारे अभ्यासक्रम तयार आहेत.

काही वर्षापूर्वी माध्यम म्हटलं, की प्रिंट मीडिया म्हणजेच वर्तमानपत्र, नियतकलिके एवढाच पर्याय होता, आता आकाशवाणी, दुरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील बातम्यांत काम करण्यासाठी पत्रकारांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.  पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष पदवी, पदविका आवश्यक आहे. ही पदवी (एमजेएमसी) व पदविका (डिप्लोमा इन जर्नलिझम) आपल्याला पदव्युत्तर म्हणजे बी.ए.बी,काॅम,बी.एस्सी  व तत्सम पदवीनंतर मिळविता येते. पुणे विद्यापीठात पत्रकरितेचा पदविका अभ्यासक्रम एक वर्षाचा व पदवी अभ्यासक्रम दोन वर्षाचा आहे. काही विद्यापीठतील बारावीनंतर पत्रकारितेतून बी.ए.  होता येते. भारतात सध्या विविध भाषांतून पाच हाजर वृतपत्रे प्रसिध्द होतात.नियतकलिकांची संख्याही 40 हजार एवढी आहे. मराठीतही वृतपत्रांची संख्या

व स्पर्धा वाढत आहे. या वर्तमानवत्रांतून बामतीदार,उपसंदापक,फोटोग्राफर,पेजिनेशन आर्टिस्ट असे करअिरचे पर्याय उपलब्ध आहेत.

आर्थिक शैक्षणिक,सांस्कृतिक, राजकारण या पारंपरिक विषयांबरोबर फॅशन,लाइफस्टाइल, न्यू ट्रेड्स,ग्राहक, महिला, मुले असे नवीन विषयही हातळणारे तज्ज्ञ पत्रकार हवे असतात. दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात 24 तास बातम्या देणाÚया न्यूज चॅनेल्स ची संख्या मोठया प्रमाणावर वाढत असल्याने त्यांना वृतनिवेदक, सूत्रसंचालक, रिपोर्टर  मोइया प्रमाणावर लागताहेत त्यातही स्पेशलायझेशन केल्यास या क्षेत्रातही उज्वल करिअर आहे. याशिवाय ई-पेपर, वेब डिझायनिंग, जाहिरात, रेडिओ, जनसंपर्क, इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामुळेही पत्रकारिता या माध्यमाचे क्षेत्र विस्तारले आहे. काही अभ्यासक्रमात लघुपट (शाॅर्टफिल्म) बनविण्याचेही प्रशिक्षण दिले जाते.

महाराष्ट्रात सर्व विद्यापीठांमध्ये पत्रकरितेचे अभ्यासक्रम सुरू आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुणे विद्यापीठाशी संलग्न अशा पुण्यातील काही  महाविद्यालगांमध्येही पत्रकारितेचे विभाग सुरू झाले आहे. इंडियन इन्स्टिटयूशन आॅफ मास कम्युनिकेशन, दिल्ली येथे पोस्ट ग्रॅज्युएट  डिप्लोमा कोर्से चालविले  जातात. त्यात पत्रकारिता रेडिओ, टीव्ही पत्रकरिता, अॅडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशन यांचा  समावेश आहे. या संस्थेत प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्हीवर परीक्षा  घेतली जाते.  काही खाजगी संस्था स्वतंत्ररीत्याही असे अभ्यासक्रम घेतात.

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या युवकांमध्ये काही गुण आवश्यक असतात. निरीक्षणशक्ती, सामाजिक घटनांकडे पाण्याचा सजरा दृष्टिकोन भाषेवरील प्रभुत्व, लिखण्याची आवड, संवाद कौशल्य, कष्टाची तयारी, वाचन, अभ्यास लोकांशी  संपर्क यासारखी कोशल्ये विकसित करण्याची गरज असते.

1 comment: