Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, June 20, 2017

फिल्ममेकर होण्याचं ध्येय गाठायचंय, मग ही बातमी वाचाच!

तुमच्याकडे लघुपट निर्मितीची क्षमता आहे, परंतु संधी मिळत नाहीये, चांगलं व्यासपीठ मिळत नाहीये अशी खंत आहे का? असं असेल तर www.7rcfilms.com  घेऊन येत आहे एक अनमोल संधी, जी तुम्हाला नेऊ शकेल यशाच्या शिखरावर. 
आम्ही भरवतोय जगातलं सगळ्यात भव्य असं मराठी शॉर्ट फिल्म्सचं फेस्टिवल. तुमच्यामधला हरहुन्नरी कलाकार जगाला दाखवायला हीच आहे एक संधी.
तुम्ही गणिताचे शिक्षक आहात  की फोटोग्राफर? अकाउंटंट आहात की इंजिनीअर... याचा आम्हाला काही फरक पडत नाही. तुमच्यामध्ये शॉर्टफिल्म बनवण्याचं, फिल्ममेकर बनण्याचं वेड असणं महत्त्वाचं. जर, तुमचं काम आम्हाला पसंत पडलं तर तुमचं चित्रपट निर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असू एक पार्टनर म्हणून...
त्याखेरीज, अन्य बक्षीसे आहेतच, ज्यामध्ये मॅकबूक एअर लॅपटॉप्स, प्रोफेशनल कॅमकॉर्डर्स आणि स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
तर, सामील व्हा जगातल्या सगळ्यात भव्य अशा मराठी लघुपट निर्मिती स्पर्धेमध्ये. नोंदणी आणि शॉर्टफिल्म सबमिट करण्यासाठी लॉग ऑन करा www.7rcfilms.com 
जर तुमच्या ओळखीचा कुणी होतकरू लघुपट निर्माता असेल तर त्याला हा मेसेज लगेच फॉरवर्ड करायला विसरू नका, कारण 14 जुलै 2017 रोजी संध्याकाळी 6 वाजता नोंदणी बंद होणार आहे.
 
Get, Set….SHOOT!
 

No comments:

Post a Comment