पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी २४ जूनला पंतप्रधान पोर्तुगालमध्ये होते. पोर्तुगालमधील पंतप्रधान मोंदींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये ‘पंतप्रधान मोदींनी फोटोग्राफरशिवाय कारमधून उतरण्यास नकार दिला असे लिहिलं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पोर्तुगालची राजधानी लिस्बनमधील आहे. यावेळी पंतप्रधानांनी चम्पालिमौड फाउंडेशनला भेट दिली होती. पोर्तुगालमधील हे एक कँन्सर रिसर्च अॅण्ड ट्रीटमेंट सेंटर आहे. पंतप्रधान मोदी ज्यावेळी या ठिकाणी पोहचले तेव्हा बराच वेळ कारमधून बाहेर पडले नाहीत.
व्हिडिओमध्ये सुरक्षा कर्मचारी मोदींच्या कारचा दरवाजा उघडून त्यांच्यासोबत बोलत असताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला यजमान मोदींच्या स्वागतासाठी तयार असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात फोटोग्राफर धावत पळत येताना दिसतात आणि पंतप्रधान मोदी दरवाजा उघडून हसतमुखाने यजमानांशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. काही लोकांनी फोटोग्राफर वेळेत आले नाहीत त्यामुळे पंतप्रधान कारबाहेर पडले नसावेत, असे म्हणत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

No comments:
Post a Comment