Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, July 22, 2017

ही आहे नवाज शरीफांची कन्या मरियम, दुसरी 'बेनझीर' म्हणून पाकमध्ये प्रसिद्ध!

इंटरनॅशल डेस्क- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबियांच्या कथित भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्ता प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. पनामा पेपर्स प्रकरणातील जेआयटीच्या चौकशी अहवाल शरीफ कुटुंबांच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. या अहवालानुसार, 1992-93 मध्ये कुटुंबीय आणि शरीफांची कन्या मरियम हिची मालमत्ता अचानक 21 पटीने वाढली. शरीफ यांची राजकीय वारसदार मानली जाणारी कन्या मरियम सफदर हिच्या संपत्तीचा विचार केल्यास 1992 मध्ये तिच्याकडे 14 लाख पाकिस्तानी रुपये होते. कुठल्याही प्रकारचे आर्थिक कमाईचे स्रोत नसताना विद्यार्थी आयुष्यातच तिच्या संपत्तीमध्ये 21 पटीने वाढ दिसून आली. त्यामुळे मरियम हिचे सुद्धा राजकीय करिअर धोक्यात आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि कुटुंबियांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि बेनामी मालमत्तेचे आरोप सिद्ध झाल्यास शरीफांचे पद जाऊ शकते. अशात पाकिस्तानचे लष्करप्रमुख अर्ध्या रात्रीत सत्ता काबिज करून लष्करशाही लागू करू शकतात अशी भिती सुद्धा वर्तवली जात आहे. मरियम म्हणजे पाकची दुसरी 'बेनझीर'...
- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम शरीफ त्यांची राजकीय उत्तराधिकारी मानली जाते. 
- खरं तर पाकिस्तानात तिचे व्यक्तीमत्त्व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्याशी जोडून पाहिले जाते. कारण मरियम सुद्धा राजकारणात बेनझीर यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करताना दिसत आहे. 
- बेनझीरप्रमाणे ती सुद्धा नेहमीच महिलांच्या हक्कासाठी आणि परंपरावादी इस्लामविरूद्ध आवाज उठवत असते. याचमुळे तिला पाकिस्तानात खूपच पसंत केले जाते.
- मरियमला नोव्हेंबर 2013 मध्ये पीएम द्वारा युवकांसाठी चालवत असलेल्या प्रोग्रॅमचे चेयरमन बनवले गेले. 
- पदाची सूत्रे हाती घेताच काही दिवसातच मरियमने 10 हजार कोटी रुपयेच्या ‘यूथ बिजनेस लोन’ स्कीमची घोषणा केली होती.
- तिच्या या निर्णयाचे पाकिस्तानात जोरदार स्वागत झाले तसेच तिच्या समर्थनात युवक-युवती पुढे आले. 
- पाकिस्तानात महिलांच्या हक्कासाठी लढणारी म्हणून मरियमला दुसरी बेनझीर भुट्टो म्हटले जाते. 
- असे असले तरी, नवाज शरीफ यांनी मरियमला आतापर्यंत कोणत्याही मंत्रालयाची जवाबदारी दिलेली नाही. 
- मरियमला आपल्या सौंदर्यासोबतच आपले कम्युनिकेशन स्किल्स आणि प्लॅनिंगसाठी ओळखले जाते.
मरियमच्या पतीला नवाजनी टाकले होते काढून-
- मरियमचे पती मोहम्मद सफदर पू्र्वी लष्करात होते. 
- आर्मीतून रिटायर होताच त्यांनी नवाज शरीफ यांची पीएमएल-एल पार्टीचे मुख्य संयोजकपदी निवड केली.
- मात्र, शरीफ यांना सफदर यांचे काम पसंत आले नाही. पार्टीतील इतर कार्यकर्तेही सफदर यांच्या कामावर खूष नव्हते.
- याबाबत सांगितले जाते की, सफदर हे शरीफ यांची पार्टी सोडून आपली नवी पार्टी बनविण्याची तयारी करत होते.
- याच कारणामुळे नाराज होऊन नवाज शरीफ यांनी वर्ष 2010 मध्ये पार्टीतून काढून टाकले होते. 
- मात्र, हा कौटुंबिक वाद मरियमने आपल्या कौशल्याने हाताळला व वाद संपवला. 
- मरियमने आपल्या पतीला समजावले व पित्यासोबतचे वाद सोडवत कौटुंबिक संबंध पुन्हा सुरु केले. 
- मरियमने घरातील वाद वाढू न दिल्याने विरोधकांना याचा फायदा उठवता आला नाही.
- मरियमच्या या धाडसी पावलाबाबत पीएमएल-एन पार्टीने तिचे जोरदार कौतूक केले होते. 
- त्याचमुळे आता नवाज शरीफ यांची उत्तराधिकारी म्हणून मरियमकडे पाहिले जाते.
पाकिस्तानच्या कट्टरपंथी प्रतिमेच्या विरोधात-
- मरियम पाकिस्तानला एक कट्टरवादी देश म्हणून असलेली ओळख मिटविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- ती आपल्या भाषणात नेहमीच सांगते की, कट्टरवाद नाकारणे हेच देशाचे अस्तित्त्व टिकवून ठेऊ शकते.
- मरियम 1997 पासून ‘शरीफ ट्रस्ट’चे कामकाज पाहत आहे. हा ट्रस्ट शिक्षण क्षेत्रात काम करतो. ट्रस्टचे संपूर्ण कामकाज मरियमच्या मार्गदर्शनाखालीच चालते.
- मरियमच्या राजकीय कौशल्याचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता की, तिला दोन भाऊ हुसेन-हसन आणि एक बहिण सुद्धा आहे. मात्र पाकिस्तानच्या राजकारणात मजबूत पकड फक्त मरियमच बनवू शकली.

No comments:

Post a Comment