Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, July 21, 2017

16 व्या वर्षी इसिसच्या दहशतवाद्याशी प्रेम, आता या स्थितीत मिळाली ही तरूणी

इंटरनॅशनल डेस्क- इराकमधील मोसुल शहरात इराकी लष्कराने एका जर्मन तरूणीला अटक केली आहे. जर्मनीत राहणारी लिंडा वेंजेल नावाची ही तरूणी 2016 मध्ये इराकमध्ये पोहचली होती. त्यावेळी लिंडा केवळ 16 वर्षाची होती. लिंडा मूळची ख्रिश्चन आहे. मात्र इराकमध्ये पोहचताच मुस्लिम धर्म स्वीकारला. बिनधास्त राहणारी लिंडा मिळाली बुर्ख्यात...
- पूर्व जर्मनीतील पुल्सनित्ज शहरात राहणारी लिंडा इंटरनेट मदतीने इसिसच्या दहशतवाद्याच्या संपर्कात आली होती.
- यानंचर ती घरी न सांगताच इराकमध्ये पोहचली होती. मात्र, लिंडा दहशतवादी बनल्याची माहिती गुप्तचर विभागाला कळाली होती.
- जर्मनी पोलिसांच्या माहितीनुसार, लिंडाला एका इसिसच्या दहशतवाद्यासोबत प्रेम झाले होते. त्याला भेटायला ती सिरीयात गेली होती.
- तेथे पोहचताच लिंडाने त्या दहशतवाद्यासोबत लग्न केले व इसिसची दहशतवादी बनली. यानंतर हे दोघे सीरियातून इराकमधील मोसुलमध्ये पोहचले.
- नुकतेच इराकी आणि संयुक्त फोर्ससनी इराकमधील मोसुल शहर इसिसच्या दहशतवाद्याच्या तावडीतून सोडवले आहे.
- जे काही उरले होते ते पळून गेले. आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यात लिंडाचाही समावेश आहे.
- लिंडाला जेव्हा अटक केली तेव्हा ती बुरख्यात होती. तिच्यासमवेत ज्या काही महिला सहकारी होत्या त्यांनी शरीरावर स्फोटक बांधली होती.

खोटे बोलून घरातून बाहेर पडली-
- मीडियाला दिलेल्या मुलाखतीत लिंडाच्या घरच्यांनी सांगितले की, 2016 मध्ये लिंडाच्या वागण्यात बदल दिसू लागला.
- नेहमीच बिनधास्त लाईफ जगणारी लिंडा त्या काळात बहुतेक घरी राहायची व कोणाला तरी चॅट करत राहायची.
- लिंडाने अरबी भाषाही शिकायला सुरुवात केली होती. घरात नेहमीच अरबी शब्दात बोलायची. स्कूल बॅगमध्ये कुराण सुद्धा ठेवायची.
- सप्टेंबर 2016 मध्ये लिंडाने घरी सांगितले की, ती जवळच्या शहरात आपल्या मित्राकडे राहायला जात आहे. मात्र ती नंतर घरी कधीच गेली नाही.
- इराकमधील मोसुल शहरात पकडल्यानंतर लिंडाची ओळख पटली आहे.

No comments:

Post a Comment