Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, July 11, 2017

पती घरी नसताना बंदुकीचा धाक दाखवून विवाहितेवर अडीच महिन्यांपासून बलात्कार


श्रीरामपूर-बंदुकीचा धाक दाखवून अडीच महिन्यांपासून वेळोवेळी विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आरटीओ कार्यालय परिसरात घडल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाले. याप्रकरणी तरुणीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अमर पवार, सपना अमर पवार (दोघे सेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीला कामासाठी औषधोपचारांसाठी आरोपींनी आपल्या घरी नेण्याचे आमिष दाखवले. तरुणीच्या घरी येऊन पती घरी नसल्याचे पाहून अमर याने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केला.

No comments:

Post a Comment