Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, July 15, 2017

हे आहेत आफ्र‍िकेतील सर्वात रहस्यमयी आदिवासी, पितात जीवंत जनावरांचे रक्त



स्पोर्ट्स डेस्क- आफ्र‍िका अनेक प्रसिध्‍द आदिवासी जमातींच्या ठिकाणांपैकी एक मानले जाते. त्यांच्या आपापल्या वेगवेगळ्या परंपरा व रिवाज आहेत. यापैकी एक आहे मसाई आदिवासी. त्यांची गुराखी व यौध्‍दा म्हणून ओळख आहे. ते टांझानिया व केनियात राहतात. मसाई आदिवासी जनावरांचे मांस खाऊन व त्यांचे रक्त पिऊन जगतात.पर्यटन स्थळांजवळ राहत असल्याने झाले प्रसिध्‍द...
आपली संस्कृती व लोकप्रिय पर्यटन स्थळांजवळ राहत असल्याने ते खूप प्रसिध्‍द आहेत. 
- ते बहुतेक मसाई मारा, सेरेनगेटी आणि अंबोसेलीसारखे संरक्षित ठिकाणाजवळ राहतात. 
- केनिया व टांझानियात यांची संख्‍या दहा लाखाजवळ आहे. 
- त्यांचे आपले मौख्य‍िक नियम-कायदे आहेत. यात त्यांच्या विविध पैलू सामाविष्‍ट असतात. 
- मसाई जमातीत ज्येष्‍ठ पुरुष प्रमुख असतात. त्यांचे निर्णय सर्व मानतात. 
- यांच्या लाल रंगाच्या कपड्यांमुळे यांना सहज ओळखले जाऊ शकते. त्यासा शुका म्हटले जाते. 
- यांच्यात मृत्यूनंतर शव दफन केले जात नाही. ते खुल्या जागेत सोडले जाते. 
- शव दफन केल्यास जमीन खराब होते, असे मानले जाते.
पितात जनावरांचे रक्त-
- मसाई आदिवासी भटके जीवन जगतात. यामुळे त्यांच्या जनावरांना चरण्‍यासाठी नवीन ठिकाण मिळू शकेल. 
- यांच्या आयुष्‍यात जनावरांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. हे मसाई आदिवासींचे खाण्‍याचे माध्‍यम आहे. 
- यांची संपत्ती यांचे जनावरे व मुलांच्या संख्‍येनुसार निश्‍चित होते. 
- मसाई खाण्‍यासाठी दूध व मटणापासून काही खास प्रसंगी जनावरांचे रक्ताचा वापर करतात. 
- खतनानंतर किंवा आजार व बाळंतपणासारख्‍या प्रसंगी हे जनावरांचे रक्त पितात. 
- जनावरांचे रक्त रोगप्रतिकार शक्तीसाठी चांगले मानले जाते. 
- या व्यतिरिक्त नशा कमी करण्‍यासाठी हँगओव्हर कमी करण्‍यासाठी रक्त पितात. 
- ते जिथे ही जातात, तिथे छोट्या झोपड्या बनवून राहतात व चारी बाजून कुंपण करतात. 
- जनावरांची कातडी यांच्या येथे बिछाना म्हणून वापर केला जातो.

No comments:

Post a Comment