नाशिक- नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना आज शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी पत्र लिहिले आहे. त्यामुळे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी जे निकष लावले आहेत, त्याविरोधात नाशिकच्या नैताळे गावात बंद पाळण्यात आला आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

No comments:
Post a Comment