Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Thursday, July 20, 2017

मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना तो छेडत होता गिटारच्या 'तारा'


बंगळुरु, दि. 20 - शरीरावर होणा-या वेगवेगळया शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया सर्वात जटील समजली जाते. रुग्णाला बेशुद्ध करुन डॉक्टर ही शस्त्रक्रिया करतात. पण बंगळुरुच्या एका रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया चालू असताना 32 वर्षांचा तरुण संगीतकार गिटारच्या तारा छेडून डॉक्टरांना मदत करत होता. म्यूझिशियन डायस्टोनिया या दूर्धर न्युरोलॉजिकल डिसऑर्डरने हा तरुण आजारी होता. 
 
या शस्त्रक्रियेव्दारे मेंदूतील काही विशिष्ट भाग जाळण्यात येतात. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार  तब्बल सात तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. या दरम्यान हा तरुण गिटारच्या तारा छेडून  नेमकी कुठे समस्या आहे ते डॉक्टरांना दाखवत होता. दीडवर्षांपूर्वी गिटार वाजवत असताना त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे व्यवस्थित काम करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. म्यूझिशियन डायस्टोनिया या आजारामध्ये आपोआप स्नायू आकुंचन पावतात. 
 
मेंदूकडून स्नायूंना चुकीचा संदेश दिल्यामुळे हा आजार होऊ शकतो. या आजारात मान, डोळे, आवाज आणि हातावर परिणाम होऊ शकतो. म्यूझिशयन्समध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळून येते. हा तरुण जेव्हा गिटार वाजवायला जायचा त्यावेळी त्याची डाव्या हातीची बोटे बरोबर चालत नव्हती. ऑपरेशन टेबलवर गिटारच्या तारा छेडून हा तरुण नेमकी मेंदूच्या कुठल्या भागात अडचण आहे ते डॉक्टरांना सांगत होता. 
 

No comments:

Post a Comment