मुंबई : भांडुपच्या ड्रीम्स मॉलच्या पायऱ्यांवरील अंधाराचा फायदा घेत प्रियकरासोबत रोमान्स करणे १५ वर्षांच्या विद्यार्थिनीला भलतेच महागात पडले आहे. त्यांच्या रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल होत वडिलांच्या मोबाइलवर आला. संतापलेल्या वडिलांनी मुलीकडे विचारणा केली असता तिने मुलाकडे बोट दाखविले. अखेर मुलीच्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रियकर मुशरफ अन्सारी तसेच शूटिंग करणारा आनंद इळकर आणि पिंकू यादवलाही आयटी अॅक्टअंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.
भांडुप परिसरात १५ वर्षांची मुलगी राहत असून ती दहावीची विद्यार्थिनी आहे. १५ दिवसांपूर्वी ती प्रियकरासोबत ड्रीम्स मॉलच्या काळोख असलेल्या जिन्यावर रोमान्स करत होती. याच मॉलमध्ये हाऊस किपिंगचे काम करत असलेल्या पिंकू आणि आनंदचे त्यांच्यावर लक्ष गेले. आनंदने हा प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. तर पिंकूने तो त्याच्या अन्य मित्रांना व्हॉट्सअॅप केला.
तो व्हिडीओ व्हायरल होत शुक्रवारी मुलीच्या वडिलांच्या मोबाइलवर पोहोचला. संतापलेल्या वडिलांनी याबाबत मुलीला जाब विचारला. मुलीने प्रियकराविरुद्ध बोट दाखविले. त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्यासोबत हा प्रकार केल्याचे सांगितले. वडिलांनी मुलीसोबत भांडुप पोलीस ठाणे गाठले.
मुलगी अल्पवयीन असल्याने भांडुप पोलिसांनी याची दखल घेत पॉक्सो, लैंगिक अत्याचार आणि आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
व्हिडीओ व्हायरल कराल तर कोठडीत
सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे चुकीचे आहे. शिवाय असा व्हिडीओ काढून व्हायरल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार केल्यास कोठडीची हवा खावी लागेल. त्यामुळे असे करणे टाळा, असे आवाहन भांडुप पोलिसांनी केले आहेत.

No comments:
Post a Comment