Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, July 17, 2017

रेल्वेत तृतीयपंथीयांची दादागिरी; ट्रेनमधुन खाली पडल्याने युवकाला गमवावे लागले दोन्ही पाय


नागपूर- मित्राचे अॅडमिशन करुन गोदिंयावरुन परतणाऱ्या एका युवकाचा तृतीयपंथीयांशी वाद झाला. या वादावादीत हा युवक रेल्वेतुन खाली पडल्याने त्याला आपले दोन्ही पाय गमवावे लागले. अतुल तांडेकर (वय 32) असे या युवकाचे नाव आहे. मयो रुग्णालयात दाखल असलेल्या रेल्वे प्रशासनाने आपल्या रेल्वेने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाचपावली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
खिशात हात घालून तृतीयपंथीयांनी काढले 900 रुपये
पांढराबोडी, रामनगर येथे राहणारा अतुल शनिवारी संध्याकाळी साडेचार वाजता गोदिंया येथून हावडा-अहमदाबाद या रेल्वेगाडीत नागपूरला जाण्यासाठी बसला. या रेल्वेगाडीत काही तृतीयपंथीय प्रवाशांना पैसे मागत होते. त्यांनी अतुलकडेही पैसे मागले. अतुलने त्यांना 10 रुपये दिले. त्यावेळी एका तृतीयपंथीयाने अतुलला भीक देतोय असा प्रश्न विचारला. त्यामुळे अतुलने त्यांना 20 रुपये दिले. त्यांनी त्याच्याकडे 100 रुपये मागितले. त्याने तेवढे पैसे न दिल्याने त्यांनी त्याच्या खिशात हात घातला. यावेळी त्यांच्यात झटापट झाली. त्यांनी त्याच्या खिशातील 900 रुपये काढून घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत अतुल रेल्वेतुन खाली पडला. त्यामुळे त्याला आपला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
अतुलला सतावत आहे भविष्याची चिंता
रात्री पावणेआठ वाजेपर्यंत अतुल रेल्वे रुळाच्या कडेलाच पडलेला होता. तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या चालकाने अतुलला रुळाच्या कडेला तडफडत असलेले पाहिल्यावर त्याची माहिती रेल्वे पोलिसांना कळवली. त्यानंतर पाचपावली पोलिसांनी त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले. अतुलने आपले दोन्ही पाय कायमस्वरुपी गमावल्याने त्याला आता पत्नी आणि एक दीड वर्षाच्या मुलीच्या भविष्याची चिंता सतावत आहे.

No comments:

Post a Comment