सीमेवर एका बाजूला पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला चीनचा धोका वाढत असतानाच सरकारने नौदलाची ताकत वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानने आपल्या महत्वकांक्षी योजनेवर पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत जगातील सर्वात अत्याधुनिक पाणबुड्या बनवल्या जाणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणारी सुरक्षेसंबंधातील एक योजना संरक्षण मंत्रालयाने रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, स्वीडन आणि स्पेनसमोर मांडली आहे. या देशांच्या मदतीने पाणबुड्यांची निर्मिती केली जाईल. या योजनेसाठी ७० हजार कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. संरकारने या योजनेला ‘प्रोजेक्ट ७५ इंडिया’ असे नाव दिले आहे. २००७ मध्ये या योजनेला होकार देण्यात आला होता, मात्र त्यानंतर या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
संरक्षण मंत्रालय या योजनेची सुरुवात लवकरच करण्याची शक्यता आहे. पाणबुड्यांच्या निर्मितीसाठी सहा देशांच्या कंपन्या मदत करतील. याच फ्रान्सची नेवल ग्रुप-डीसीएनएस, जर्मनीची थायस्सेक्रप मरीन सिस्टम, रशियाची रोसोबोरोनएक्पोर्ट रूबिन डिजाइन, स्पेनची नवनसिया, स्वीडनची साब आणि जपानची मित्सुबिशी-कावासाकी हॅवी इंडस्ट्रीज एकत्रीतपणे मदत करणार आहे. या पाणबुड्यांच्या निर्मितीनंतर हिंद महासागरात एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानला दोन्ही आघाडीवर लढता येणार आहे.

No comments:
Post a Comment