Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Sunday, July 30, 2017

लालूंचा नवा डावपेच; नितीश कुमारांना शह देण्यासाठी शरद, मांझींना आरजेडीत येण्याचे निमंत्रण


पाटणा- बिहारमध्ये जेडीयू-भाजप आघाडीचे सरकार बनल्यानंतर राजद प्रमुख लालू यादव यांनी जेडीयूचे नेते शरद यादव यांनी हिंदुस्तान अवामी मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांना आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शरद यादव यांना तर थेट राजद मध्ये सामील होण्याचे निमंत्रणच धाडण्यात आले आहे. नितीश कुमार हे राजद- काँग्रेसच्या महाआघाडीपासून दुर होत सहाव्यादा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. शनिवारी त्यांच्या 26 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता.

लालू म्हणाले, बिगर भाजप पक्षांनी एकत्र यावे
- लालू प्रसाद यांनी शरद यादव यांना आवाहन केले आहे की, बिगर भाजप पक्षांनी एकत्र यावी यासाठी त्यांनी मदत करावी.
- मी शरद यादव यांच्यासोबत अनेकदा लाठ्या खालल्या आहेत, असे लालू यादव म्हणाले. शरद यादव यांचे चेले असणाऱ्या नितीश कुमार यांनी त्यांना दगा दिला आहे. शरद यादव माझ्यासोबत आल्यास बिहारमधील गावांचा दौरा करणार असून लोकांना नितीश कुमाराचे खरे रुप सांगणार आहे.
लालू यांनी मांझी यांना केला फोन
- बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासोबतही लालू यादव यांनी चर्चा केली आहे. त्यांनी त्यांना महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. मांझी यांना हटवत नितीश कुमार हे मुख्यमंत्री बनले होते.
- रालोसपा नेता उपेंद्र कुशवाह यांनाही लालू हे महाआघाडीत येण्यासाठी निमंत्रण पाठवणार आहेत. ते नितीश कुमार-सुशीलकुमार मोदी यांच्या विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

No comments:

Post a Comment