नांदेड, सोळाव्या अमरनाथ यात्रेकसाठी नांदेड येथुन धर्मभुषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेलेले सर्व यात्रेकरू बालताल कॅम्प येथे सुरक्षीत असुन, सर्वांचे अमरनाथचे दर्शन झाल्याची माहिती अॅड. दिलीप ठाकुर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.
वातावरण व्यवस्थीत असल्यामुळे अवघड असलेली अमरनाथ यात्रा पुर्ण करतांना कोणताही त्रास झाला नाही. सर्वांची प्रकृती उत्तम असुन सर्वजण बालताल येथे थांबले आहेत. आतंकवादी बु-हान वाणी याचे वर्ष श्रघ्द असल्याने फुटीरवाद्यांनी काश्मीर बंद केल्यामुळे एक दिवसासाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडचे सर्व यात्रेकरू शनिवारी बालताल मिलीटरी कॅम्पमध्ये राहणार आहेत. रविवारी सकाळी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मिलीटरी बंदोबस्तात निघणार आहेत. त्यामुळे नातेवाईक व हितचिंतकांनी काळजी करू नये असे आवाहन अॅड. दिलीप ठाकुर यांनी बालताल येथून केले आहे

No comments:
Post a Comment