Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, August 18, 2017

4 एकरात पसरलाय या युद्धनौकेचा डेक, समोर आले आतील PHOTOS





ब्रिटनची सर्वात मोठी व सर्वात पॉवरफुल वॉरशिप ‘क्वीन एलिजाबेथ’ 700 क्रू मेंबर्ससह प्रथमच आपल्या होम पोर्टवर पोहचत आहे. टेक्नोलॉजीच्या रूपात पाहायचे झाल्यास ही शिप ब्रिटनची आतापर्यंत सर्वात अॅडवान्स्ड वॉरशिप आहे. 3 बिलियन पाउंड खर्च आलेली ही रॉयल नेवी नावाची वॉरशिप 2020 पासून सेवेत दाखल होईल. 4 एकरात पसरलेल्या या शिपच्या डेकमधील आतील फोटोज समोर आले आहेत.रॉयल नेवी 50 वर्षे देईल सेवा....
- एचएमएस क्वीन एलिजाबेथ ब्रिटनमध्ये बनणारी सर्वात मोठी वॉरशिप आहे. रॉयल नेवीचे हे शिप 2020 मध्ये ऑपरेशनल होईल.
- आपल्या आधुनिक तंत्रज्ञानासह ही वॉरशिप सुमारे 50 वर्षे नेवीला आपली सेवा देईल.
- ‘बिग लिजी’ नावाने प्रसिद्ध या वॉरशिपचा डेक सुमारे 4 एकरात पसरलेला आहे. तिची लांबी 280 मीटर (920 फूट) आणि वजन 65 हजार टन आहे. 
- इतके जड वजन असूनही ही शिप एका दिवसात 500 मैल (804 किलोमीटर) अंतर आरामात कापू शकते.
- शिपचे कॅप्टन अॅडमिरल जोन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ही वॉरशिप आपल्या मित्र व शत्रूंना समुद्रात आपली ताकद दाखविताना दिसेल.

No comments:

Post a Comment