Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, August 19, 2017

एका दिवसात एक लाख वीस हजार रुपये दंड वसूल नांदेड विभागाने 405 विनातिकीट प्रवाश्यांवर केली कार्यवाही,



दक्षिण मध्य रल्वे, नांदेड विभा विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते.  या अंतर्गतच आज नांदेड विभागाने मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी केली. ज्यात श्रीमती नेहा रत्नाकर, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड, श्री अंजी नायक, सहायक वाणिज्य व्यवस्थापक-दोन या तीनही वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. 
हि मोहीम सकाळीच 6 वाजता सुरु करण्यात आली. यात परभणी आणि मानवत रोड या स्थानका वर धावणाऱ्या  गाड्या मध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. धावणाऱ्या रेल्वे मध्ये सेक्शन मध्ये अचानक धाड पडल्याने विना तिकीट प्रवाश्यांचे धाबे दणाणले. यात तब्बल 405 विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त समान घेवून जाण्यामुळे काही प्रवाश्यांवर कार्यवाही करण्यात आली. यातही काही  प्रवाश्यांनी दंड न भरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या विना तिकीट प्रवाश्यांकडून एका दिवसातच एक लाख  वीस हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आल्या. 

या कार्यवाहीत सहायक कार्मिक अधिकारी, नांदेड तसेच  22  तिकीट तपासनीस, 6 वाणिज्य निरीक्षक आणि 9  रेल्वे पोलीस फोर्स चे जवान शामिल झाले . 

या तिकीट तपासणी मोहिमेत दिवसभरात धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. 

तसेच तपासणी दरम्यान असे लक्षात आले कि अनधिकृत फेरीवाले बऱ्याच प्रमाणात या गाड्यांने फिरत आहेत. आज अशा 07 अनधिकृत फेरीवाल्यांवर कार्यवाही करण्यात आली. 
हि तिकीट तपासणी विनातिकीट प्रवास  करणाऱ्या मध्ये  नैतिक  भीती निर्माण करण्या करिता आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्या करिता करण्यात आली. 
या तिकीट तपासणी मुळे  कोणतीही रेल्वे गाडी उशिरा धावणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. या कमी सहायक परिचालन अधिकारी, नांदेड यांनी खूप मदत केली. 

रेल्वे विभागातर्फे डॉ. अखिलेश कुमार सिन्हा , विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी जनतेस आवाहन केले आहे कि प्रवाश्यांनी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा आणि होणार्या कार्यवाहीला टाळावे. गेल्या आठवड्यात कार्यवाही करूनही काही जन विना तिकीट प्रवास करत आहेत, आणि कार्यवाहीला सामोरे जात आहेत हि बाब चिंताजनक आहे.  



No comments:

Post a Comment