'
औरंगाबाद -मराठासमाजाला आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ऑगस्टला मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात संपूर्ण समाजबांधवांनी सहभागी व्हावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी शहरात ऐतिहासिक जनजागृती मोटार वाहन रॅली काढण्यात आली. २० हजारांवर मराठा बांधव रॅलीत सहभागी होते.
कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शेतमालाला उत्पादन खर्च वजा जाता ५० टक्के नफा या तत्त्वावर हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अॅट्रॉसिटीतील गैरप्रकार थांबवावेत, चुकीच्या तक्रारी करणाऱ्यांविरोधात तेवढ्याच प्रमाणात शिक्षेची तरतूद करावी आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाज वर्षभरापासून आंदोलन करत आहे. मात्र, सरकारने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. यामुळे ऑगस्टला क्रांतिदिनी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात सकल मराठा बांधवांनी सहभागी व्हावे यासाठी गावोगावी जोरदार पूर्वनियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज शहरात भव्य जनजागृती मोटार वाहन रॅली काढण्यात आली.
रॅलीचीसुरुवात आणि समारोप : सिडको,एन-३ मधील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणातून रॅली सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आलेले ट्रॅक्टर रॅलीच्या अग्रभागी होते. पुंडलिकनगरात रॅली आल्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. गजानन महाराज मंदिर, त्रिमूर्ती चौकमार्गे क्रांती चौकात रॅली आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचे प्रस्थान झाले. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजीराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून कॅनॉट प्लॅस येथे राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, न्याय्य हक्कांसाठी चला मुंबईला आदी घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
पोलिस प्रशासनाच्या मते, रॅलीत हजारावर दुचाकी अन् हजारांवर लोकांचा सहभाग होता. तर आयोजकांच्या मते, हजारांवर दुचाकी, ३०० चारचाकींसह २० हजारांचा सहभाग होता.

No comments:
Post a Comment