मुंबई, दि. 2 - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी आणि यशस्वी बिझनेसवुमन अशी नीता अंबानी यांची ओळख. त्या शौकीन आहेत आणि तशीच त्यांची ओळखही आहे. त्यांच्या लक्झरी शौकची कल्पना म्हणजे त्यांच्या दिवसाची सुरुवात ही 3 लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते यावरूनच येते. गेल्या वर्षी एका मुलाखतीत त्यांनीच याबाबत माहिती दिली होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. आयपीएलमध्ये स्वतःची टीम मुंबई इंडियन्सला चियर करताना असो की एखाद्या प्रोडक्टच उद्घाटन, नीता अंबानी हे नाव चर्चेत असतंच. लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जाणा-या नीता अंबानींची आवड खूप शाही आहे. त्यांच्या साड्या, घड्याळ, हॅंडबॅग, फुटवेअर प्रत्येक गोष्ट हटके असते. एवढे सर्व शौक असताना टेक्नॉलॉजीच्या जमान्यात त्यांच्याकडे असलेले गॅझेटही शानदार आणि हटके असणार यात काही शंका नाही. त्यांच्याकडे असलेल्या फोनची किंमत ऐकून तुम्ही खरंच उडाल. अर्थात जगातील सर्वात शानदार फोनपैकी एक फोन त्या वापरतात. या फोनच्या किंमतीमध्ये एखादं प्रायव्हेट जेटदेखील घेता येईल. 'एशियानेटन्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, नीता अंबानी या 'फॉल्कन सुपरनोटा आयफोन 6 पिंक डायमंड' हा फोन वापरतात.
वृत्तानुसार नीता अंबानींच्या फोनची किंमत 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 311 कोटी रूपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. वर्ष 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता. फोनशिवाय त्या जगातील सर्वात महागडी हॅंडबॅगदेखील वापरतात. 30 ते 40 लाख रूपये इतकी त्यांच्या हॅंडबॅगची किंमत असल्याचं बोललं जातं. याशिवाय जगातील 10 सर्वात महागड्या घरांमध्ये या जोडीच्या घराची गणना होते.
ही आहे फोनची खासियत-
- वर्ष 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता.
- 24 कॅरेट गोल्ड आणि पिंक गोल्डपासून हा फोन बनवण्यात आला आहे.
- या फोनला हॅक करण्याचा प्रयत्न झाला तरीही मालकाला अलर्ट जातो
- फोनवर प्लॅटिनमची कोटिंग आहे त्यामुळे हा फोन तुटणं शक्य नाही.
- लिमिटेड एडिशन असलेल्या या फोनची निर्मीती कंपनी मागणीनुसार करते.
ही आहे फोनची खासियत-
- वर्ष 2014 मध्ये हा फोन लॉन्च झाला होता.
- 24 कॅरेट गोल्ड आणि पिंक गोल्डपासून हा फोन बनवण्यात आला आहे.
- या फोनला हॅक करण्याचा प्रयत्न झाला तरीही मालकाला अलर्ट जातो
- फोनवर प्लॅटिनमची कोटिंग आहे त्यामुळे हा फोन तुटणं शक्य नाही.
- लिमिटेड एडिशन असलेल्या या फोनची निर्मीती कंपनी मागणीनुसार करते.

No comments:
Post a Comment