नवी दिल्ली - राजनाथसिंह म्हणाले डोकलाम वादावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. आम्हाला विश्वास आहे की चीन सकारात्मक पुढाकार घेऊन शांतता कायम ठेवेल. त्याआधी भारत-चीन सीमावाद सुरु असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पुन्हा एकदा सीमेवर युद्धाभ्यास केला आहे. 45 दिवसांमध्ये चीनने युद्धाभ्यास करण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन महिन्यांपासून सिक्किम येथील डोकलाम येथे सीमेवर भारत-चीन सैन्य आमने-सामने आहे. भारताचे म्हणणे आहे की चीनी सैन्य मागे हटत नाही तोपर्यंत भारतीय सैन्याला मागे घेणार नाही, तर चीनने देखील अशीच अट ठेवली असून भारत आमच्या भागात बळजबरी घुसला असल्याचा आरोप केला आहे.
पीएलएच्या 10 यूनिटने भाग घेतला
- चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी झालेल्या युद्धाभ्यासादरम्यान चिनी मिलिटरीचे 10 युनिट सहभागी झाले होते. यात हवाईदल आणि भूदळाचा सहभाग होता.
- चीनने युद्धाभ्यासाचा 5 मिनिटांचा व्हिडिओ देखील जारी केला आहे. त्यात म्हटले आहे, की चिनी लष्काराने कशा प्रकारे हेलिकॉप्टरने डोंगरावर क्षेपणास्त्र डागले.
- मागीलवेळी तिबेटजवळ युद्धभ्यास करण्यात आला होता, मात्र यावेळी ठिकाण सांगण्यात आलेले नाही.
- चीनचे वृत्तपत्र द लियान्हे जाओबाओ ने म्हटले आहे की या युद्धाभ्यासाचा उद्देश भारताला धमकावणे हाच होता. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून डोकलामममध्ये भारत-चीन सैन्य आमने-सामने आहे.

सैन्य ताकदीच्या भ्रमात राहू नका...
- ग्लोबल टाइम्सने युद्ध तज्ज्ञांच्या हवाल्याने म्हटले होते, 'भारताने आपल्या सैन्य ताकदीबद्दल अतिआत्मविश्वास बाळगू नये. त्यांनी या भ्रमात राहू नये की चीन आपल्याला घाबरतो आणि समझौता करण्यास पुढे येईल. भारताने लक्षात घेतले पाहिजे की उभय देशातील मिलिटरी गॅप 1962 पेक्षा जास्त वाढला आहे. सिक्कीममधील डोकलाम जे चीनच्या सीमेत येते... येथे भारतीय सैन्याने घुसखोरी करुन परिस्थिती बिघडवली आहे. हा तणाव अजून कमी झालेला नाही, तरीही बीजिंग या मुद्द्यावर डिप्लोमॅटिक मार्गाने यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.'

भारताने आपले सैन्य तातडीने मागे घ्यावे
- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी म्हटले आहे, की 1960 मध्ये चीनमध्ये भारतीय राजदुतांनी म्हटले होते की चीन-भारत-भूतान सीमेवरुन आमचा कोणताही वाद नाही. तेव्हा त्यांनी डिप्लोमॅटिक निवदेनही दिले होते. आम्ही पुन्हा एकदा भारताला आवाहन करतो की सीमा करार आणि चीनच्या सार्वभौमत्त्वाचा सन्मान करा. भारताने चीनच्या सीमेत अवैधरित्या घुसखोरी केली आहे, त्यांनी तातडीने मागे फिरावे.

No comments:
Post a Comment