Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, August 2, 2017

राज्यसभेत गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर अमित शहा नाराज


नवी दिल्ली -भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षातील खासदारांच्या बेशिस्तीचा विषय गांभीर्याने घेतला आहे. राज्यसभेत अनुपस्थित राहायचे असल्यास भाजप खासदारांनी त्याची पूर्वसूचना द्यावी; अन्यथा अनुपस्थितीचे लेखी कारण द्यावे, असे शहांनी बजावले. आपली नाराजी अमित शहा यांनी भाजप संसदीय बैठकीत मंगळवारी बोलून दाखवली.
मागासवर्गीयांसाठी असलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणी विरोधी पक्षांनी वरिष्ठ सभागृहात केली होती. त्या वेळी वरिष्ठ सभागृहात भाजप खासदारांची संख्या कमी असल्याचे शहा यांनी बैठकीत म्हटले. दोन्ही सभागृहांच्या कामकाजादरम्यान भाजप खासदारांची संख्या पूर्ण असणे अपेक्षित आहे.
अनुपस्थितीची चूक पुन्हा होणार नाही, अशी आपली अपेक्षा असल्याची तंबीही शहांनी बैठकीत दिली. विशेष आदेश भाजपने काढले आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा नामोल्लेख न करता शहा म्हणाले की, त्यांची उपस्थिती हा पक्षासाठी गंभीर विषय असेल.
७४ मताधिक्याने विधेयक संमत
वरिष्ठ सभागृहात मागास प्रवर्गाविषयीचे विधेयक ५२ विरुद्ध ७४ मताधिक्याने संमत झाले. या वेळी राज्यसभेत भाजपचे ५६ संसद सदस्य उपस्थित होते, तर विरोधी पक्षाचे ८८ सदस्य होते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान अवैध ठरलेल्या मतांचा उल्लेखही या वेळी शहांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या पूरग्रस्त परिसराच्या दौऱ्यावर असल्याने त्यांची अनुपस्थिती समजण्यासारखी असल्याचे शहा म्हणाले.

No comments:

Post a Comment