मलेशियातील कलांग शहरामध्ये एक विचित्र प्रकरण सामोर आले आहे. तेथील एका 32 वर्षीय पतीने दावा केला आहे की, त्याची पत्नी त्याच्याकडे रोज विचित्र मागणी करायची आणि मागणी पूर्ण न करताच त्याला दांडक्याने मारहाण करायची.
काय असायची पत्नीची मागणी
- त्या व्यक्तीचे आणि त्याच्या पत्नीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. तो व्यक्ती एका कारखान्यात काम करतो आणि मागील कित्येक वर्षांपासून पत्नीचे अत्याचार सहन करत आहे. शेवटी पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.
- पिडीत व्यक्तीने पोलिसांना सांगितले आहे की, त्याची पत्नी रोज दहा ते बारा वेळेस त्याच्याकडून शरीर सुखाची मागणी करत असे. तिची गरज पुर्ण न केल्यास ती पतीला बेदम मारहाण करायची. व्यक्तीने सांगितले आहे की, त्यांना मुलेदेखील आहेत.
- रोज कारखान्यातून काम करुन आल्यावर पूर्णपणे थकून जात असे. अशावेळेस पत्नीची ही मागणी आपल्याला पूर्ण करता येत नसे. मात्र पत्नी काहीही ऐकूण घेण्यास तयार नसे व आपल्याला गुडघ्यावर बसवून बेदम मारहाण करायची, असे पिडीत व्यक्तीने सांगितले आहे.
- या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी पिडीत व्यक्तीची वैदकीय चाचणी घेतली. यामध्ये व्यक्तीच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आढळून आल्या.
- मात्र पिडीत व्यक्तीने सांगितले आहे की, त्याला पत्नीविरोधात कोणतीही तक्रार करायची नाही. फक्त या त्रासापासून आपण मुक्त होऊ इच्छितो असे या व्यक्तीने सांगितले आहे.
- अखेर याप्रकरणी पोलिसांनी पिडीत व्यक्तीला पत्नीशी चर्चा करण्यास सांगितले आहे. तसेच पत्नीची मेडीकल काऊंन्सलिंग करण्याचीही सूचना पोलिसांनी दिली आहे.


No comments:
Post a Comment