Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Friday, August 18, 2017

१३ वर्षांनंतर गाजरात सापडली हि-याची अंगठी

टोरँटो (कॅनडा) : अत्यंत आवडती, पण हरविलेली हि-याची अंगठी सापडल्यावर महिलांना जो आनंद होतो तो मेरी ग्राम्स यांना मिळाला. २००४मध्ये अल्बर्टातील आपल्या स्वत:च्या शेतात मेरी यांची ही हिºयाची अंगठी हरवली होती. ती सापडत नसल्याचे फक्त मेरीच्या मुलालाच माहीत होते. १४ आॅगस्ट रोजी मेरी यांची सून डेले त्यांच्या शेतातून गाजर काढत होती. तिला गाजरासोबत अंगठी त्यात फसल्याचे दिसले. जमिनीखाली पुरलेल्या अंगठीतून गाजर वाढलेले दिसले. त्यामुळे गाजरासोबत अंगठीही जमिनीबाहेर आली. अंगठी हरविल्याचे मेरीने नवºयाला वाईट वाटेल, म्हणून सांगितले नव्हते. दरम्यान, मेरीने अंगठी हरविल्याचे जाहीर होऊ नये, म्हणून स्वस्तातील अंगठी बनवून घेतली होती. डेले हिने गाजर धुतल्यावर ती हिºयाची अंगठी असल्याचे स्पष्ट झाले. मेरीच्या मुलाने अंगठी बघताच, ती आपल्या आईची असू शकते, असे म्हटले व आईला तसे सांगितले. अंगठी हरविल्याचे मी नवºयापासून लपवून ठेवायला नको होते, असे मेरी ग्राम्स म्हणाल्या. २००५ मध्ये मेरीच्या नवºयाचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment