Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Wednesday, May 31, 2017

विश्वांजली गायकवाड राज्यात प्रथम




पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१६मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात प्रथम आली आहे. देशभरातून १,०९९ जण उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांनीही चमकदार कामगिरी केली आहे.
विश्वांजली गायकवाड देशात ११वी आली असून, स्वप्निल खरे देशात ४३वा आला आहे. विश्वांजली दुसऱ्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाली असून, तिला परराष्ट्र सेवेत जायचे आहे. याशिवाय स्वप्निल रवींद्र पाटील (५५), भाग्यश्री दिलीप विसपुते (१०३), प्रांजली लहेनसिंग पाटील (१२४), सूरज अनंता जाधव (१५१), स्नेहल सुधाकर लोखंडे (१८४), अनुज मिलिंद तारे (१८९), विदेह खरे (२०५), राहुल नामदेव धोटे (२०९), अंकिता धाकरे (२११), योगेश तुकाराम भारसट (२१५), श्रद्धा पांडे (२१९), किरण खरे (२२१), स्वप्निल थोरात (६००), अभिषेक टाले (८७७) हे राज्यातील विद्यार्थी चमकले आहेत़
विश्वांजलीने २०१४मध्ये सीओईपीमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले आहे. गेल्या ३ वर्षांपासून ती यूपीएससीची तयारी करीत होती. तिचे आई व वडील दोघेही मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत.
तिचा भाऊ इंजिनीअरिंग करतो आहे. विश्वांजली राज्यात पहिली आल्याचा निकाल जाहीर होताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. प्रभात रोडवरील तिच्या निवासस्थानी तिचे नातेवाईक व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी धाव घेतली.
ठाण्याचा स्वप्निल पाटील ५५वा
यूपीएससी परीक्षेत ठाण्याच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. संस्थेच्या स्वप्निल पाटील याने देशात ५५वा क्रमांक पटकावला आहे.
आपल्या अंधत्वावर मात करीत गतवर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उल्हासनगरच्या प्रांजली पाटील हिने सलग दुसऱ्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण होताना ७७३वरून १२४व्या क्रमांकावर मजल मारली.
श्रद्धा पांडे हिचा २१९वा, तर स्वप्निल थोरात याचा ६००वा क्रमांक आला आहे. त्याचबरोबर संस्थेच्याच जगदीश बाकन यांची डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट आॅफिसर म्हणून निवड झाली आहे. संस्थेचे संचालक प्रकाश बाळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. उल्हासनगरचा अभिषेक टाले हा ८७७व्या गुणानुक्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तो ‘पीआरपी’चे ठाणे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रमोद टाले यांचा मुलगा आहे.
गेली चार वर्षे मी या परीक्षेकरिता अभ्यास करीत असून हा माझा
चौथा प्रयत्न होता. सुरुवातीला लेखी, मुलाखत अशा विविध फेऱ्यांमध्ये मी नापास झालो. मात्र, हिंमत न हारता दररोज सुमारे १२ तास मी अभ्यास केला.
स्वप्निल पाटील,
यूपीएससी परीक्षेत ५५वा क्रमांक

No comments:

Post a Comment