तळेगाव दाभाडे (पुणे) : शेतकरी संपावर जात आहेत ही गंभीर बाब आहे. शेतकरी संपाबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या प्रश्नी केंद्राने व राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. देशभरात शेतकरी हा महत्त्वपूर्ण घटक असून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही़ शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) येथे बोलताना सांगितले.
खासदार वंदना चव्हाण यांनी सांसद ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या वार्तालापात त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांबाबतच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली़
No comments:
Post a Comment