Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Tuesday, May 30, 2017

तरुण नाही तरुणींनी मिळून केला सामूहिक बलात्कार





जोहान्सबर्ग, दि. 30 - दक्षिण अफ्रिकेत तीन तरुणींनी मिळून एका 23 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार केला आहे. तरुणींनी सर्वात आधी तरुणाला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तरुण बेशुद्ध झाल्यानंतर त्याचं अपहरण करण्यात आलं. तरुणींनी सलग तीन दिवस तरुणाला बंदी ठेवत त्याच्यावर बलात्कार केला. बलात्कार पीडित तरुण अद्यापही घाबरलेला आहे. दक्षिण अफ्रिकेत पुरुषांवर बलात्कार होणं तसं काही नवीन नाही. वारंवार अशा घटना समोर येत असतात. आकडेवारीनुसार बलात्कारांपैकी 20 टक्के प्रकरणांमध्ये पुरुष पीडित असतात. 
 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुण शुक्रवारी शेअर टॅक्सीतून प्रवास करत होता. यावेळी टॅक्सीत अगोदरच तीन तरुणी होत्या. तरुण जेव्हा टॅक्सीत बसला तेव्हा काही वेळाने टॅक्सीने आपला मार्ग बदलला. तरुणींनी तरुणाला ड्रायव्हरच्या सीटशेजारी बसण्यास सांगितलं. तरुण पुढे जाऊन बसला असता त्यांनी चालाखीने त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं. तरुणाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो एका अनोळख्या खोलीत होता. 
 
पीडित तरुणाने आरोप केला आहे की, तिनही तरुणींनी त्याला जबरदस्तीने एनर्जी ड्रिंक पाजलं, आणि त्यानंतर आळीपाळीने बलात्कार केला. तीन दिवसांनंतर तरुणींनी तरुणाला अर्धनग्न अवस्थेत एका मैदानात सोडलं. तरुणाची परिस्थिती अत्यंत खराब होती. तिथून जात असलेल्या एका कारच्या मदतीने तो रुग्णालयात पोहोचला. 
 
'अन्याय कोणाविरोधातही झाला असला तरी अशा प्रकारच्या लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्याला गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचं', पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आरोपींना शिक्षा देत न्याय मिळवून देऊ असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 
 
दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेत पुरुष आणि महिलांवर होणा-या लैंगिक अत्याचारांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. आकडेवारीनुसार दरवर्षी बलात्काराच्या पाच लाख घटना समोर येतात. यामधील 20 टक्के पीडित पुरुष असतात. पोलीस प्रकरण गंभीरतेने घेत नसल्याने अनेकदा पुरुष पीडित पोलिसांकडे तक्रार करत नाहीत.
 

No comments:

Post a Comment