पाकिस्तानमधील पत्रकार आमिर लियाकत नेहमीच भारतासंबंधी प्रचंड आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग करत असतो. यावेळी आमिरनं आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय पत्रकार व 'रिपब्लिक' वृत्तवाहिनी संपादक अर्णव गोस्वामी यांना टार्गेट केले आहे.
काही दिवसांपूर्वी अर्णव यांनी आपल्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पाकिस्तानी जनरलला फटकारल्यानं लियाकतनं अर्णव यांच्यावर निशाणा साधला आहे.
अर्णव यांना टार्गेट करत आमिरनं पाकिस्तानातील वृत्तवाहिनीवर त्यांच्या कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिपदेखील प्रसारित केली. अर्णव यांच्या कार्यक्रमातील व्हिडीओ क्लिप वृत्तवाहिनीवर प्रसारित करुन त्यानं अर्णव गोस्वामी यांच्याप्रती अभद्र भाषेचा प्रयोगही केला.
कार्यक्रमादरम्यान आक्रमक होणा-या अर्णव यांच्यावर टिप्पणी करत आमिरने सुरुवातीला त्यांना ''मासे विक्री करणारा'' असा उल्लेख करत त्यांचा अपमान केला.
No comments:
Post a Comment