Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 5, 2017

विधवा भावजयीवर दिराने दोनवेळा केला बलात्कार, कुटुंबियांनी सुनेला ठेवले 10 दिवस डांबून


अकोला- विधवा भावजयीच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत अविवाहित दिराने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने आपबिती सासरा, सासू, जेठ, जेठाणी यांना सांगितल्यावर घरची इभ्रत वेशीवर टांगल्या जाऊ नये, या खोट्या प्रतिष्ठेपायी महिलेला निर्दयीपणे 10 दिवस घरात डांबून ठेवले. महिलेने पोलिसांकरवी सुटका करून घेऊन खदान पोलिस ठाणे गाठले व घटनेची फिर्याद दिली. पोलिसांनी बलात्कारी दिरासह सासरा, सासू व जेठ-जेठाणीविरुद्ध विविध कलमान्वये सोमवारी गुन्हे दाखल केले आहेत.
राधाकृष्ण टॉकीजच्या मागे व्यंकटेश नगरात नरेंद्र छगनलाल शर्मा कुटुंबिय राहते. शर्मा यांच्या विधवा सुनेने दिलेल्या तक्रारीवरून अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकली. पीडित महिलेचे लग्न 1998 साली झाले. त्यानंतर तिच्या पतीचे शॉक लागून 2005 मध्ये मृत्यू झाला. महिलेला दोन मुले असल्याने मुलांच्या भविष्याचा विचार करीत तिने सासरीच राहण्याचा निर्धार केला होता. 10 वर्षे तिचे सासरा, सासू, जेठ व जेठाणी यांनी चांगला व्यवहार ठेवला. मात्र मुलांच्या शिक्षणाचा खर्च जसजसा वाढत गेला तशी तिला देण्यात येणाऱ्या वागणुकीत बदल होत गेला. अशातच तिचा अविवाहित दिर सुनिल नरेंद्र शर्मा याची तिच्यावर वाईट नजर पडली. 2 नोव्हेंबर 2016 रोजी घरचे सर्व लोक एका नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त गेले असता दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असताना त्याने तिच्याशी लगट केली व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी व मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती तिला दाखवली. मात्र त्यानंतरही महिलेने संध्याकाळी 7.30 वाजता कुटुंबिय घरी आल्यानंतर त्यांना आपबिती सांगितली. आता घरची इज्जत तुझ्याच हाती असल्याने तिची समजूत काढून प्रकरणाची वाच्यता न करण्याविषयी सांगितले. त्यानंतर कुटुंबियांचा तिच्यासोबतचा व्यवहार चांगला राहिला. मात्र पुन्हा 18 मे रोजी तिचा दिर सुनिल शर्मा याने घरी कुणी नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती पुन्हा घरच्यांना दिल्याने घरच्यांनी तिला घरातच 10 दिवस डांबून ठेवले. पीडितेच्या मामाला तिला डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खदान पोलिसांकरवी तिची सुटका केली. आता महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी दिर नरेंद्र शर्मा याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून महिलेला डांबून ठेवणे अत्याचारात सहकार्य केल्याप्रकरणी सासरा नरेंद्र छगनलाल शर्मा, सासू शीलादेवी शर्मा, जेठ मुकेश नरेंद्र शर्मा, जेठाणी संगिता, दुसरा जेठ शाम शर्मा व जेठाणी निशा यांच्याविरुद्ध भांदवी कलम498 अ, 344, 506, 109, 34 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी सासरा व शाम शर्मा यांना संध्याकाळी अटक केली आहे.

No comments:

Post a Comment