https://www.youtube.com/watch?v=aoBE9kgnDxM&feature=youtu.be
पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाची कार्यवाहीने अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले!
6 लक्ष 73 हजारा ची दारु तर 5 लक्ष रुपयांचा गुटखा असा 12 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त..
माहूर/ प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारून अवैधरित्या देशी विदेशी दारुची व शासनाकडून बंदीस्त असलेला गुटख्याची विक्री केल्या जात असल्याच्या माहिती वरुन जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या विशेष पथकाने आज दि.5 (सोमवार)रोजी माहुर शहरात धडक कार्यवाही केली.अवैद्य रित्या साठवून ठेवलेली 6 लाख 73 हजार 247 रुपयांची दारु व दुसर्या एका धाडीत सुमारे 5 लक्ष रुपयांचा मुद्देमाल असा एकुन 12 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती विशेष पथकातील पोलीस अधीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी पुण्यनगरीला दिली.या धडक कार्यवाही ने अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहे.
मुख्य रस्त्यावरील ५०० मीटर अंतरात असलेल्या दारूची दुकाने बंद करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर सुद्धा माहूर येथील हॉटेल विहार बार मध्ये खुलेआम दारूची जादा दराने विक्री होत होती
याची माहिती पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना यांना लागताच त्यांनी काल आठवडी सुट्टीवर असलेल्या पथक प्रमुख व अवैध धंद्याचे कर्दनकाळ ओमकांत चिंचोलकर यांना तातडीने कारवाई करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार आज दि. ०५ सोमवारी ओमकान्त चिंचोलकर व त्याच्या पथकानी माहूर येथील विहार बारवर छापा टाकून धाडसी कार्यवाही केली. या कार्यवाहीत सुमारे ४६ प्रकारची विदेशी दारू व बियर अंदाजित ०६ लाख ७३ हजार २४७ किमतीचा अवैध रित्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. बार मालक रामचंद्र धुमय्या कोलावार रा. पुसद रोड माहूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला विशेष पथकाने अटक करून माहूर पोलीसाच्या स्वाधीन केले आहे.
तसेच माहूर शहरात व परिसरात अवैध रित्या गुटखा विक्री होत असुन, त्यांचे मुख्य केंद्र माहूर आहे, असे समजताच पथक प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी आज दिवसभरात माहुर पोलिस स्टेशन हद्दीत, आरोपी मोहमद कलीम पिता मोहमद खलील वय २८ पुसद रोड माहूर हा गुटख्याची विक्री करतो.अशी माहिती मिळाल्यावर याची खात्री करून त्याच्या घराच्या बाहेरच्या बाजुला असलेल्या शेडमध्ये तपासणी केली असता सर्वच कंपनीचा मोठ्या प्रमाणात गुटख्याची पोते अंदाजित ५ लक्ष रुपये किमतीची जप्त केला.आरोपी मात्र पथकाच्या हाती लागला नाही.सदर बातमी लिहे पर्यंत माहुर पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु होती.

No comments:
Post a Comment