Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Saturday, June 3, 2017

कोल्हापूरात रात्री 11 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचा धक्का

कोल्हापूर - शनिवारी रात्री 11 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास कोल्हापूरमध्ये भूकंपाचा 4.8  रिश्टर स्केलचा धक्का  जाणवला. या धक्क्याने काही कालावधीसाठी कोल्हापूरकरांची भंबेरी उडाली.
8 ते 20 सेकंदापर्यंत जाणवलेल्या धक्क्यात दारे, खिडक्यांची तावदाने यांचा जोरात आवाज झाला, पत्रे असलेल्या छतातून मोठा आवाज झाल्याने  लोक घाबरून घराबाहेर पळाले. कोयना धरणाच्या बॅक वॉटर मध्ये पाण्याच्या खाली 6 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्र बिंदू असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर सह सांगली,सातारा जिल्ह्यात सुद्धा या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

No comments:

Post a Comment