Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 12, 2017

लालूंच्या पत्नीला हव्यात 'संस्कारी बहू'!


पाटणा, दि. 12 - भारतीय राजकारणात वादग्रस्त असले तरी लालूप्रसाद यादव हे त्यांच्या ग्रामीण बाजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पत्नी राबडीदेवीही त्याच वळणाच्या. लालू आणि राबडी यांचे मुलगे तेजस्वी आणि तेजप्रताप हेही आता राजकारणात स्थिरावत आहेत. आता राबडी देवी यांना चिंता लागली आहे ती मुलांचे हात पिवळे करण्याची. मात्र सर्वसामान्य भारतीय सासूंप्रमाणेच राबडीदेवींनाही गुणवान मुली सून म्हणून हव्या आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्या 70 व्या जन्मदिनानिमित्त रविवारी त्यांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा राबडी देवी यांना तुम्हाला कशाप्रकारच्या  सुना पाहिजे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी सिनेमा आणि मॉलमध्ये जाणाऱ्या मुली सून म्हणून आपल्याला नको आहेत. तर संस्कारी मुलींचा सून म्हणून पाहिजे, असे सांगितले. 
लालू प्रसाद यादव यांचे तेजस्वी आणि तेज प्रताप हे मुलगे सध्या बिहारच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. लग्नाचे वय झालेल्या या मुलांसाठी लालू आणि राबडी देवी सध्या वधूचा शोध घेत आहेत. आम्हाला सिनेमा, मॉलमध्ये जाणारी सून नको आहे. भावी सुनेबाबत अपेक्षा सांगताना राबडी देवी म्हणाल्या, मला सिनेमाला, मॉलमध्ये जाणारी सून नको आहे. थोरामोठ्यांचा आदर करणारी, घर चालवणारी, जसे आम्ही आहोत तशाच सूना आम्हाला हव्या आहेत

No comments:

Post a Comment