Breaking News

आपल्या Whats App ग्रुप मध्ये 7798904000 किंवा 7507103000 नंबर ऍड करा व नमस्कार महाराष्ट्राचे अपडेट मोबाईलवर मिळावा

Monday, June 12, 2017

रक्तदान करा आणि रांगेशिवाय शिर्डीच्या साईंचं दर्शन घ्या!



शिर्डी: रक्तदान केल्यानंतर तुम्हाला ताबडतोब शिर्डीच्या साईंचं दर्शन मिळणार आहे. हो हे खरं आहे. कारण शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं ही अनोखी योजना सुरु केली आहे.शिर्डी संस्थानात आता भक्तांच्या सोयीसाठी विविध योजना राबवल्या जाणार आहेत. इथल्या रक्तदान युनिटमध्ये यापुढं रक्तदान केल्यास व्हीआयपी पास मोफत दिला जाणार आहे. यामुळं रक्तदानाकडं भाविकांचा ओढा वाढेल आणि या रक्ताचा फायदा गरजूंना होईल असं विश्वस्तांना वाटतं.साईबाबांच्या चरणी येऊन कोणतंही दान करण्यापेक्षा रक्तदान करण्याची ही आयडीया भक्तांनाही आवडली आहे.भक्तांच्या चालण्यातून वीजेची निर्मिती आणि फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती अशा भन्नाट योजनाही संस्थानानं आखल्या आहेत.शिर्डी हे तिरुपतीनंतर भारतातलं सर्वात श्रीमंत देवस्थान. श्रीमंती पलीकडं आता हे देवस्थान वेगळी ओळख निर्माण करु पाहत आहेत. साई मंदिरांच्या श्रीमंतीपेक्षा साईबाबांच्या सेवेची श्रीमंती पोहचवण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

No comments:

Post a Comment